शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

जलयुक्त शिवार आता लोकचळवळ

By admin | Updated: June 8, 2015 02:57 IST

जलयुक्त शिवार या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठी राबविण्यात ...

मुख्यमंत्री फडणवीस : हिंगणा, काटोल, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील जलसंधारण कामांची पाहणी नागपूर : जलयुक्त शिवार या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘जलयुक्त शिवार’ हे केवळ अभियान राहिले नसून ती आता लोकचळवळ बनली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर जिल्ह्यातील मोंढा, उखळी, जुनेवाणी, किन्ही (हिंगणा), काटोल तालुक्यातील पांजरा (काटे), बाजारगाव, बोरगाव, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील धानोली, घुरखेडा आदी गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू नाला, खोलीकरण, नाला रुंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट नालाबांध, आर्ट आॅफ लिव्हिंग अंतर्गत लोकसहभागातून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, आ. आशिष देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, माजी आ. विजय घोडमारे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, कृषी अधिकारी सहभागी झाले होते. जुनेवाणी येथे पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात ६ हजार गावांमध्ये २७ विविध प्रकारची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अजूनही ८२ टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेती सिंचनाखाली आल्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार नाही. या अभियानांतर्गत लोकसहभागातून सुमारे ३० कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गरज भासल्यास काही कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या पावसाळ्यात या कामाचे दृश्यरुप पाहायला मिळेल आणि त्यानंतर स्वत:हून लोकं मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, येत्या पाच वर्षात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील. जलक्रांतीशिवाय आता पर्याय नाही. सिमेंटनाला बांध, माती नालाबांध, शेततळे, नाला, बंडींगमध्ये पावसाळ्यात पडणारे पाणी साठविल्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी आपोआप वाढेल. उखळी मोंठा येथील नाला खोलीकरणाची पाहणी करताना ते म्हणाले, नाल्याच्या काठावर वृक्ष लागवड केल्यास काठावरील माती ढासळणार नाही, आणि पर्यावरणाचेही संवर्धन होईल. कामाच्या दुरुस्तीसाठी अधिकचा निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. मोंढा, उखळी शिवारात कृषी विभागामार्फत एकूण नऊ कामे करण्यात आली. पहिल्या नाल्याची लांबी २९० मीटर तर खोली २.८० मीटर करण्यात आली. त्यामुळे ७.८२ टी.बी.एच. जलसाठा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या नाल्याची लांबी २४५ मीटर आणि तिसऱ्या नाल्याची लांबी २२५ मीटर करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाचं सहसंचालक विजय घावटे व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी संयुक्तरीत्या दिली. आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेमार्फत हिंगणा तालुक्यातील जुनेवाणी, डेगमा, अंबाझरी, खामली शिवारातील कामांसाठी पाच पोकलॅण्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. यात २२ कि.मी. लांबीच्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. यावर १ कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, त्यातील १७ लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण कामाविषयी समाधान व्यक्त केले असून, ही कामे अधिक जोमाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)