शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मुक्या श्वानांसाठी जागोजागी ठेवली जलपात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:30 IST

भटकी जनावरे व मुक्या श्वानांची तहान भागविण्यासाठी नागपुरात सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या वतीने शहरात ठिकठिकाणी जलपात्र ठेवण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे कोरोनामुळे मनुष्यावर संकट ओढवले असताना मुक्या जीवानाही हाल सोसावे लागत आहे. अर्धा एप्रिल महिना लोटला तसा सूर्याचा ताप वाढायला लागला आहे. अशावेळी भटकी जनावरे व मुक्या श्वानांची तहान भागविण्यासाठी सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या वतीने शहरात ठिकठिकाणी जलपात्र ठेवण्यात आले आहेत.एप्रिल, मेच्या  गरमीत माणसाचा त्रास वाढतो तसे प्राण्यांनाही प्रचंड हाल सहन करावे लागतात. किंबहुना मुक्या प्राण्यांना अधिकच त्रास होतो. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी इकडेतिकडे भटकंती करावी लागते. पाण्याविना प्राण्यांचा जीवही जातो. प्राण्यांचे हे हाल लक्षात घेता सेव्ह स्पीचलेसच्या स्मिता मिरे यांच्या पुढाकाराने शहरात ठिकठिकाणी मुक्या जनावरांसाठी ६४ जलपात्र ठेवण्यात आले. सेव्ह स्पीचलेसच्या कार्यकर्त्यांनी स्वत: खर्च करून हे जलपात्र खरेदी केले आणि निर्धारित ठिकाणी ठेवले. छत्रपती चौक, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, विद्यापीठाची नवीन इमारत, अंबाझरी गार्डन, आयटी पार्क, लक्ष्मीनगर चौक, दीक्षा•ाूमी चौक, शंकरनगर, महाराज बाग, व्हेटरनरी कॉलेज, सीताबर्डी पोलीस स्टेशन, सदर, गिट्टीखदान पोलीस स्टेशन, काटोल नाका, अमरावती रोड, समर्थनगर, शिवाजीनगर, गांधीनगर अशा ६४ ठिकाणी हे जलपात्र ठेवले आहेत. संस्थेतर्फे पुन्हा १०० ठिकाणी जलपात्र ठेवण्यात येणार असल्याचे स्मिता मिरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. संस्थेच्या सदस्यांनी स्वत: परिश्रम घेत हे जलपात्र जागोजागी ठेवले, शिवाय यामध्ये पाणीसुद्धा भरून ठेवले आहे. या सिमेंटच्या जलपात्रामध्ये नियमित पाणी भरून ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्मिता यांनी सांगितले. ज्या लोकांना मुक्या जीवांसाठी जलपात्र घ्यायचे आहेत त्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेण्याचे किंवा संस्थेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :dogकुत्रा