शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये पाण्याचे एटीएम : मंगळवारपासून एक रुपयात शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:32 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) रुग्णांची वाढती संख्या, नवे विभाग, नवे वॉर्ड यामुळे थोड्या अधिक प्रमाणात शुद्ध पाण्याच्या समस्येला सर्वांनाच तोंड द्यावे लागते. या समस्येवर मेडिकलच्या १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने कायम स्वरूपी तोडगा काढाला. मेडिकलला पाण्याचे ‘एटीएम’च भेट दिले. रुग्णांना केवळ एक रुपयामध्ये एक लिटर शुद्ध व थंड पाणी २४ तास मिळणार आहे. उद्या ७ मे पासून याची सुरुवात होणार आहे. परिणामी, पाण्यासाठी रुग्णांची धावाधाव थांबणार आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी धावाधाव थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) रुग्णांची वाढती संख्या, नवे विभाग, नवे वॉर्ड यामुळे थोड्या अधिक प्रमाणात शुद्ध पाण्याच्या समस्येला सर्वांनाच तोंड द्यावे लागते. या समस्येवर मेडिकलच्या १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने कायम स्वरूपी तोडगा काढाला. मेडिकलला पाण्याचे ‘एटीएम’च भेट दिले. रुग्णांना केवळ एक रुपयामध्ये एक लिटर शुद्ध व थंड पाणी २४ तास मिळणार आहे. उद्या ७ मे पासून याची सुरुवात होणार आहे. परिणामी, पाण्यासाठी रुग्णांची धावाधाव थांबणार आहे.मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडीला) तीन हजारावर रुग्ण उपचारासाठी येतात, तर १८००वर रुग्ण भरती असतात. प्रत्येक रुग्णासोबत एक किंवा दोन नातेवाईक असतात. या सर्वांना सोई पुरविण्यात मेडिकल प्रशासनाची तारांबळ उडते. अडचण जाते ती पाण्याची. मेडिकलला रोज ३० लाख लिटर पाण्याची गरज भासते. परंतु १५ ते १७ लाख लिटरवर पाणी मिळते. यामुळे उन्हाळ्यात व इतरही वेळी पाणी समस्या निर्माण होते. मेडिकल प्रशासन आपल्या परीने ही समस्या सोडविते. परंतु काही प्रमाणात शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम राहतो. दरम्यान मेडिकलच्या माजी विद्यार्थ्यांची १९९३ ‘बॅच’चे हे २५वे वर्ष आहे. ही बॅच ‘रजत महोत्सव’ साजरा करीत आहे. या निमित्ताने संघटनेचे डॉ. अमित दिसावल, डॉ. यु. चांडक, डॉ. सुकेश झवर व डॉ. संजय बुले यांनी ‘पाण्याचे एटीएम’ उभारण्याचा निर्णय घेतला. अधिष्ठात्यांकडून याला मंजुरी मिळताच. डॉ. अमित दिसावल व डॉ. मुरारी सिंग यांनी ‘एटीएम’साठी जागेची पाहणी केली. शल्यक्रिया अपघात विभागाच्या बाजूला बंद असलेल्या पोलीस बुथच्या ठिकाणी हे एटीएम उभारण्यात आले. बुलडाणा अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे संचालक व या माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. झवर यांनी बँकेतर्फे दोन जलशुद्धीकरण यंत्र व वॉटर एटीएम बसविण्यासाठी पुढाकार घेतला. पाण्याचे एटीएम उभारण्याचे कार्य पूर्ण झाले. याचे अवलोकन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी केले. परंतु प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पाण्याची तपासणी करण्याचा सूचना दिल्या. दोन दिवसांपूर्वी पाण्याचा पॉझिटीव्ह अहवाल आला. यामुळे अक्षयतृतीयाचा दिवशी म्हणजे मंगळवारी पाण्याचे एटीएम सुरू होणार आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईकांची थंड व शुद्ध पाण्याची समस्या निकाली निघण्याची शक्यता आहे.२४ तास शुद्ध पाणीरुग्णांना अद्ययावत सोई उपलब्ध करुन देण्याचा मेडिकलचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. माजी विद्यार्थ्यांचेही याला पाठबळ मिळते. नुकतेच १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने स्तुत्य कार्य करीत पाण्याचे ‘एटीएम’ भेट दिले. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना २४ तास शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आणखी भर पडली आहे.-डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयWaterपाणीatmएटीएम