टाकळघाट ग्रामपंचायतचा निर्णय : नागपूर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रममनोज झाडे/चंदू कावळे टाकळघाटहिंगणा तालुक्यातील टाकळघाट हे गाव बुटीबोरी एमआयडीसी परिसरालगत आहे. त्यामुळे या भागात वास्तव्याला असणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संख्याही मोठी आहे. शिवाय, मागील काही वर्षांपासून या भागात चोरीसह अन्य घटनांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच चोरीसह अन्य गुन्हेगारीच्या घटनांच्या तपासात पोलिसांना मदत व्हावी किंबहुना; या घटनांना कायमचा आळा बसावा, यासाठी गावाच्या प्रवेशद्वारासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. टाकळघाट गावालगत बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत असल्याने तसेच या परिसरातील कंपन्यांमुळे या ग्रामपंचायतचे आर्थिक उत्पन्नही चांगले आहे. याच उत्पन्नातून गावाचा सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असून, विकास कामे केली जात आहेत. कंपन्यांमुळे टाकळघाट व परिसरात महाराष्ट्रीयन व परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यातच या भागात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. त्यामुळे चोऱ्यांसह गुन्हेगारीच्या अन्य घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त होतात. या घटनांच्या तपासात पोलिसांना मदत व्हावी किंबहुना, या प्रकाराला कायमचा आळा बसावा, यासाठी टाकळघाट ग्रामपंचायतने गावातील महत्त्वाच्या सहा ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात गुरुवारी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. स्वखर्चाने गावात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावणारी टाकळघाट ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.
‘सीसीटीव्ही’द्वारे गावावर ‘वॉच’
By admin | Updated: June 4, 2016 02:59 IST