शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

नजर ठेवून चोराने भरदिवसा निवृत्त कर्मचा-याला लुटले

By admin | Updated: January 3, 2017 14:30 IST

नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचा-याला मारहाण करून एकाने 32 हजार 500 रुपये लुटले.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 3 - मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचा-याला मारहाण करून एकाने 32 हजार 500 रुपये लुटले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. नानाजी धनाजी इंगळे असे तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव आहे. इंगळे गेल्या वर्षी कारागृह सेवेतून निवृत्त झाले. सध्या ते कारागृहाशेजारी असलेल्या कर्मचारी निवासातच राहतात. त्यांना घराचे बांधकाम करायचे असल्यामुळे त्यांनी सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रमधून 24 हजार रुपये काढले. 
 
त्यांच्याजवळ 8500 रुपये होते. अशा प्रकारे एकूण 32, 500 रुपये खिशात घालून ते सायकलने आपल्या निवासस्थानाकडे निघाले. कारागृहाच्या मुख्य दारातून विश्रामगृहाजवळच्या मैदानापासून घराकडे जात असताना अचानक एकाने त्यांना रोखले. मारहाण करुन आरोपीने  इंगळे यांच्या खिशातील 32 हजार 500 रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. झटापटीत इंगळे यांचा खिसाही फाटला. यानंतर या आरोपी बाईकवर फरार झाला.  
 
इंगळे यांनी आरडाओरड करीत कारागृहासमोरच्या रक्षकांना ही माहिती दिली. मात्र, ते रस्त्यावर येईपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता. नेहमी कडेकोट बंदोबस्त असणा-या कारागृहाजवळ भरदिवसा ही लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली.  
 
बँकेतूनच केला पाठलाग 
इंगळे यांनी धंतोली ठाण्यात माहिती कळवताच पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी बँकेतूनच इंगळे यांच्यावर नजर ठेवून होता, हे स्पष्ट झाले. त्याने तेथून पाठलाग करुन इंगळेंना निर्जन ठिकाणी गाठले आणि त्यांची रक्कम हिसकावून घेतली.  इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोटरसायकलवर मागे बिना नंबरची प्लेट होती. त्यामुळे हा गुन्हेगार सराईत असावा, असा अंदाज काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी लुटमारीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.