शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 11:03 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर नजर राहणार असून, बल्क एसएमएस किंवा समाजमाध्यमांच्या वापराची माहिती उमेदवारांकडून घेण्यात येईल.

ठळक मुद्देनिवडणुकीत कोरोना प्रोटोकॉलवर विशेष लक्षशुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाकरिता निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. प्रचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी या निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर नजर ठेवली जाईल. तसेच, बल्क एसएमएस किंवा सोशल मीडियाच्या वापराची माहिती निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण निवडणुकीत कोरोना प्रोटोकॉलवर विशेष लक्ष राहणार असून महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद सदस्य व पंचायती समिती सभापती मतदार आहेत. सध्या यांची संख्या ५६२ निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता निवडणुकीत पक्षांकडून होणाऱ्या प्रचाराच्या वेळी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर नजर राहणार असून, बल्क एसएमएस किंवा समाजमाध्यमांच्या वापराची माहिती उमेदवारांकडून घेण्यात येईल. या निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग व माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.

अशी आहे मतदारसंख्या (संभावित)

महानगरपालिका १५५ (१५० नियुक्त व ५ नामनिर्देशित)

जिल्हा परिषद ५८

नगर पा. व न. पंचायत ३३६

पंचायत समिती सभापती १३

निवडणूक कार्यक्रम

१६ ते २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल

२४ नोव्हेंबरला अर्ज छाननी

२६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल

१० डिसेंबरला मतदान

१४ डिसेंबरला मतमोजणी

टॅग्स :ElectionनिवडणूकlocalलोकलGovernmentसरकार