शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर करडी नजर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. या भेसळखोरांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे दिले. सोमवारी अन्न व औषध विभागाच्या नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले.

भेसळसंदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत अशा असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावा. लगेच कारवाई करा. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या सहाही जिल्ह्यांमध्ये हॉटेल व्यावसायिक व अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांच्या बैठका घ्या. भेसळीशिवाय उत्तम दर्जाचे अन्न पदार्थ, त्यावर निर्मिती आणि एक्स्पायरीसंदर्भातील तारखा छापल्या गेल्या अथवा नाही याची खातरजमा करा, येत्या काही दिवसांत आकस्मिक भेटी वाढवा. तपासण्या वाढवा, असेही स्पष्ट केले.

राज्यात प्रतिबंधित वस्तू आयात-निर्यात होण्याची शक्यता आहे, यावर लक्ष ठेवा. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीच्या तपासण्या वाढवा, औषध प्रशासन विभागाने नियमित मेडिकल स्टोअर्सची तपासणी करावी, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्यास मेडिकल स्टोअर्सला मज्जाव करावा, अशा पद्धतीची औषधी सहज उपलब्ध होत असेल तर मेडिकलवर कारवाई करावी, असेही सांगितले. बैठकीला नागपूर विभागाचे सहआयुक्त ए. आर. वाने, चंद्रपूरचे सहायक आयुक्त नितीन मोहिते, भंडारा, गडचिरोलीचे ए.पी. देशपांडे, औषधे विभागाचे नागपूर येथील सहायक आयुक्त पी. एम. बल्लाळ, चंद्रपूरचे उ.ग. बागमारे उपस्थित होते.

- बॉक्स

- ऑक्सिजन व औषधांची उपलब्धता

नागपूर विभागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती हे लक्षात घेऊन ऑक्सिजनचा साठा व त्याचा सुलभ, सहज नियमित पुरवठा याकडे लक्ष ठेवा. राज्य शासनाने यासंदर्भात साठवणुकीचे सूत्र ठरविले असून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात साठा व्हावा. बेकायदा रेमडिसिविर इंजेक्शन विक्री व साठा विरुद्ध धडक कारवाईसह औषधांचा तुटवडा नागपूर विभागात जाणवणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.