लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणी वाचविण्याच्या उद्देशाने ग्रीन उपक्रमात वाहन धुण्याचे अनेक विभाग आहेत. त्यातील एक अनन्य विभाग म्हणजे वॉटरलेस वॉश. या अंतर्गत नागपूर महापालिकेची बस वॉशिंग करण्यात येत आहे.जलसंपत्ती नष्ट होऊ नये याकरिता सीए निमेश पटेल आणि सीए अमन जैन यांनी पेटंट सोल्यूशन विकसित केले आहे. हा पर्याय पर्यावरणाला अनुकूल आहे. या सोल्यूशनच्या मदतीने वॉश माय राईडने बस धुण्यासाठी लागणाऱ्या ३०० ते ४०० लिटर पाण्याचा तुलनेत ५ ते १० लिटर पाणी लागते. वॉश माय राईडच्या या अनोख्यास नाविन्यास स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महापालिकेनेही पाण्याची बचत करण्यासाठी नागरी नाविन्य म्हणून नामित केले आहे. त्याची पुनरावृत्ती संपूर्ण भारतातील अनेक शहरांमध्ये होणार आहे. मनपामध्ये बस धुताना मागील दोन महिन्यांत २.५ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे.हा उपक्रम राबविणारी आणि निर्जल वाहने धुण्याची संकल्पना सादर करणारे प्रथम बस ऑपरेटर म्हणून मनपा नागपूरच्यावतीने मनपाच्या बसेस चालविणारे दिलीप छाजेड यांचा वॉश माय राईड यांनी सत्कार केला. या हरित उपक्रमांतर्गत धुतल्या जाणाऱ्या बसेसची संख्या वाढून दररोज सुमारे १.५ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे.माहिती देताना दिलीप छाजेड, मनपा उपायुक्त राकेत मोहिते, मनपाचे परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे, मनपाचे स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी दोसरवार, जे.पी. पारेख, अतुल कोटेचा, नीलमणी गुप्ता, सदानंद काळकर आणि अनुसूया काळे छाबरानी उपस्थित होते.
वाहन धुण्यासाठी वॉश माय राईड पर्याय : दररोज १.५० लाख लिटर पाण्याची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:44 IST
पाणी वाचविण्याच्या उद्देशाने ग्रीन उपक्रमात वाहन धुण्याचे अनेक विभाग आहेत. त्यातील एक अनन्य विभाग म्हणजे वॉटरलेस वॉश. या अंतर्गत नागपूर महापालिकेची बस वॉशिंग करण्यात येत आहे.
वाहन धुण्यासाठी वॉश माय राईड पर्याय : दररोज १.५० लाख लिटर पाण्याची बचत
ठळक मुद्दे मनपामध्ये बस धुण्यासाठी वापर