शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ राखीला तिचा ‘स्पर्श’ होता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:14 IST

१२ दिवसांपासून संघर्षात्मक जीवन जगत असलेल्या आपल्या लेकीला आणि बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून ‘त्या’ राखीला...फक्त तिचा स्पर्श घेत ‘त्याने’ आपल्या मनगटावर आईच्या आणि छोट्या ताईच्या हाताने राखी बांधून घेतली.

ठळक मुद्देकुणाच्याही वाट्याला येऊ नये असले ‘रक्षाबंधन’: सारेच गहिवरले

अभय लांजेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रक्षाबंधन...भाऊ-बहिणींच्या प्रेमळ नात्यांचा आनंदी क्षण... या क्षणाला वाात्सल्यमूर्ती मोठ्या बहिणींनी आणि खोडकर लाडक्या बहिणींनी आपल्या भावांच्या मनगटावर रेशीमधागा बांधला. हे चित्र सर्वत्र असले तरी ‘त्या’ पीडितेसाठी आणि तिच्या लाडक्या भावासाठी आजचे रक्षाबंधन ‘न भूतो न भविष्यती’ ठरावे आणि कुणाच्याही वाट्याला असले दु:ख येऊच नये, हीच प्रार्थना! कारण १२ दिवसांपासून संघर्षात्मक जीवन जगत असलेल्या आपल्या लेकीला आणि बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून ‘त्या’ राखीला...फक्त तिचा स्पर्श घेत ‘त्याने’ आपल्या मनगटावर आईच्या आणि छोट्या ताईच्या हाताने राखी बांधून घेतली. हा क्षण अत्यंत भावूक आणि अश्रूंना वाट मोकळी करून देणारा होता.उमरेड वेकोलि क्षेत्रातील गोकुल खदान येथे २४ वर्षीय वेकोलि महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्काराचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १४ आॅगस्टच्या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे. कुटुंबीय अक्षरश: मानसिकदृष्ट्या खचले आहे. घटनेपूर्वीच ‘त्या’ पीडितेने रक्षाबंधनाची पूर्वतयारी केली होती. आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ‘तिने’ रेल्वेचे आरक्षणही करून ठेवले होते. तत्पूर्वीच ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. आजच्या घडीला ‘ती’ उपचारास हळूवार प्रतिसाद देत असली तरी, तिची प्रकृती स्थिरावली नाही. ती बोलू शकत नाही. केवळ हालचालीची भाषा तिला थोडीफार कळते. या नाजूक क्षणाला तिला कोणताही त्रास होऊ नये याची दक्षताही कुटुंबीय आणि डॉक्टर घेत आहेत. अशातच आज रक्षाबंधनाचा दिवस उजाडताच पीडितेच्या भावाने आज रक्षाबंधन असल्याची जाणीव करून दिली. लागलीच तिनेही आपल्या भावाला प्रतिसाद दिला. क्षणातच त्याने आपल्याजवळील राखीला तिचा ‘स्पर्श’ घेतला. बाहेर येत आई आणि ताईच्या हाताने ती राखी मनगटावर बांधून घेतली. यावेळी सारेच गहिवरले होते. कुणाच्याही वाट्याला असले रक्षाबंधन येऊ नये, असाच वाटणारा हा प्रसंग.

‘आपला माणूस’आज रक्षाबंधनाच्या क्षणाला ‘त्या’ पीडित बहिणीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधली असेल की नाही, या प्रश्नाने ‘तो’ अस्वस्थ होता. या अतिशय गंभीर प्रसंगी ‘त्या’ भावाची काय अवस्था असेल, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात आले आणि लागलीच आपल्या सख्ख्या बहिणीच्या हाताने राखी न बांधताच अनेकांच्या मदतीला धावणारा ‘आपला माणूस’ नागपूरच्या खासगी रुग्णालयात पोहोचला. ‘त्या’ माणसाने पीडितेच्या कुटुंबीयांना आपुलकीने विचारपूस केली. सोबतच मला पीडितेचा भाऊ म्हणून तुमच्याकडून राखी बांधायची आहे, अशी इच्छा पीडितेच्या आईजवळ व्यक्त केली. त्या मायमाऊलीने अश्रूंना वाट मोकळी करून देत ‘त्या’ माणसाच्या मनगटावर राखी बांधली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन