शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध वॉरन्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 20:12 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्या चार उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरन्ट जारी केला. तसेच, चारही अधिकाऱ्यांना येत्या २१ आॅगस्ट रोजी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित होण्याचे व न चुकता प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

ठळक मुद्देहायकोर्ट : उपस्थिती टाळल्यामुळे दिला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्या चार उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरन्ट जारी केला. तसेच, चारही अधिकाऱ्यांना येत्या २१ आॅगस्ट रोजी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित होण्याचे व न चुकता प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेत.वॉरन्ट बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षासह व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीनिवासन, महाव्यवस्थापक आर. एम. सिंग (कार्मिक), पुणे येथील मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक प्रदीप खांडेकर व सेवानिवृत्त मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक विजय खिरडीकर यांचा समावेश आहे. एका अवमानना प्रकरणात नोटीस तामील होऊनही हे अधिकारी न्यायालयात उपस्थित झाले नाही. त्यामुळे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी या अधिकाऱ्यांना दणका दिला.कंपनीचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक (स्केल-३) सुरेश फाळणीकर यांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. फाळणीकर यांनी वेतन श्रेणी, पदोन्नती, निवृत्तीवेतन सुधारणा इत्यादी बाबींसाठी सुरुवातीला उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. १५ सप्टेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने त्यांना कंपनीकडे निवेदन सादर करण्यास सांगितले होते. तसेच, त्यांच्या निवेदनावर कायद्यानुसार निर्णय घ्यावा असा आदेश कंपनीला दिला होता. त्या आदेशाचे पालन झाले नाही असे फाळणीकर यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. व्ही. एस. धोबे यांनी बाजू मांडली.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे