शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे कोरोनाविरोधात जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:09 IST

कोरोनाचा सर्वत्र प्रचंड उद्रेक होत असल्याचे पाहून जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आमगे आता जनजागरण करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. पोलीस विभागाच्या मदतीने तिने सोमवारी विविध भागात फिरून जनजागरण केले आणि नागरिकांना घरीच रहा, सुरक्षित रहा, असा संदेश दिला.

ठळक मुद्दे नागरिकांना केले आवाहनघरातच रहा सुरक्षित रहा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा सर्वत्र प्रचंड उद्रेक होत असल्याचे पाहून जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आमगे आता जनजागरण करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. पोलीस विभागाच्या मदतीने तिने सोमवारी विविध भागात फिरून जनजागरण केले आणि नागरिकांना घरीच रहा, सुरक्षित रहा, असा संदेश दिला.नागपुरातील रहिवासी असलेली ज्योती आमगे जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून सुप्रसिद्ध आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही ज्योतीची नोंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वत्र प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. मात्र अशातही काही मंडळी बेदरकारपणा दाखवत असून हे उपद्रवी शहरातील वेगवेगळ्या भागात मोकाट फिरताना दिसत आहेत. एकटे दुखटे नव्हे तर ते घोळक्याने ठिकठिकाणी उभी असल्याचे दिसतात. एका दुचाकीवर तीन तीन जण फिरत असल्याचेही चित्र उपराजधानीत बघायला मिळत आहे. हे सर्व पाहून आपण अस्वस्थ झालो आहे त्यामुळे रस्त्यावर येऊन जनजागरण करण्याचा निर्णय घेतल्याचे ज्योती म्हणते आहे. ज्योतीने पोलिसांच्या मदतीने आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजता टेलीफोन एक्स्चेंज चौक आणि विविध भागात जनजागरण केले. पोलिसांच्या जीपच्या समोरच्या भागावर अर्थात बॉनेटवर उभी राहून ज्योती जनजागरण करीत होती.नागरिकांना उद्देशून ती काही प्रश्न करत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढत असताना तुम्ही बाहेर कशाला आलात, तुम्ही कशाला फिरत आहात, असा प्रश्न करून घरातच रहा, वारंवार सॅनिटायजर करा, साबण वापरा, हात धुवा आणि स्वच्छता राखा, असा संदेशही ज्योती देत होती. दरम्यान, तिला पत्रकारांनी या संबंधाने विचारणा केली असता, अशा भयावह स्थितीत नागरिकांची बेफिकिरी पाहून आपल्याला खूप राग येत असल्याचे ज्योती म्हणाली कोरोना चा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची सुरक्षा स्वत: घेणे आवश्यक आहे पोलीस जनजागरण करीत करीत आहेत. नागरिकांना बाहेर फिरू नका, घरातच रहा, असे आवाहन करीत आहेत, मात्र अनेक जण पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाही. ते बेफिकिरीने बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे हा प्रकार संतापजनक असल्याचे ज्योती म्हणाली. पोलीस त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र आपली काळजी आपणच घेण्याचे आणि आपली सुरक्षा आपणच करण्याचे प्रत्येकाची कर्तव्य आहे, असेही ज्योती म्हणाली. ज्योतीच्या या जागरणामुळे नागरिकांवर किती प्रभाव पडतो त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.पोलिसांना सहकार्य कराकोरोना पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पोलीस आपले घर, आपले कुटुंबीय मागे ठेवून अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र काही मंडळी जाणीवपूर्वक घराबाहेर फिरून पोलिसांचा त्रास वाढवत आहेत, हे योग्य नसून आपण सर्वांनीच पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे ज्योती आमगे म्हणाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस