शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वंदनाने कापली नस, अंकिता झाल्या वेड्या

By admin | Updated: December 13, 2014 03:01 IST

जीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले.

दयानंद पाईकराव नागपूरजीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले. यातील नाशिकच्या वंदना आहेर हिने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला तर गोडखा ता. घनसावंगी जिल्हा जालनाच्या अंकिता ढेरे (६०) यांना हा धक्काच असह्य झाल्यामुळे त्या वेड्यासारख्या वागत होत्या. एक नव्हे तर तब्बल आठ हजार कुटुंबं या कंपनीमुळे हादरलेली आहेत.केबीसी कंपनीने दोन वर्षात तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखविल्यामुळे अनेक ठेवीदार या कंपनीकडे आकर्षित झाले. त्यांनी आपल्या जीवनाची कमाई या कंपनीत जमा केली. संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण गाशा गुंडाळून पळून गेल्याचे कळताच आठ हजार कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच घसरली. नाशिकच्या वंदना बंडू आहेर (३२) यांनी तर कंपनीत २५ लाखाची गुंतवणूक केली होती. त्यांचे पती सुतारकाम करतात आणि त्या मजुरी करतात. त्यांनी जीवनभराची कमाई आणि अंगावरील सोन्याचे दागिने मोडून कंपनीत पैसे भरले. कंपनीने गाशा गुंडाळल्याचे कळताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. घरात कुणी नसताना त्यांनी आपल्या डाव्या हाताची नस कापली. बराच रक्तस्राव झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. अगदी वेळेवर त्यांची जाऊबाई आल्यामुळे त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. परंतु मोठा मुलगा अमितचे शिक्षण बारावीनंतर बंद झाल्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. पैसे गेल्यामुळे घरात सर्वांच्या मनावर मानसिक ताण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सारख्याच अंकिताबाई नायबराव ढेरे (६०) रा. गोडखा ता. घनसावंगी जि. जालना या महिलेने सुद्धा पाच लाखाची रक्कम कंपनीत गुंतवली होती. रक्कम घेणारी कंपनी फसवी असल्याचे समजल्यानंतर त्यांचा मनावरील ताबा सुटून त्या वेड्यासारख्या वागत होत्या. त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार दिल्यामुळे त्या कशाबशा सावरल्या आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या मनावर ताण असल्यामुळे त्यांना स्पष्टपणे बोलताही येत नव्हते. वंदना आणि अंकिताबाई यांच्यासारख्या अनेकांचे संसार केबीसीच्या लाटेत उघड्यावर आले आहेत. हिवाळी अधिवेशनात शासन मागण्यांची दखल घेऊन जीवनाच्या उर्वरित आयुष्यात कामी येणारी रक्कम देईल या आशेपोटी सर्वजण मोर्चात सामील झाले आहेत.