शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सुदृढ नागरिकांना मारायचे आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 23:56 IST

सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शासकीय चिकित्सा महाविद्यालय व इस्पितळात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोविड-१९ संक्रमित रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ठळक मुद्दे व्हिडिओ व्हायरल : मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या संक्रमितांचा सवालपायाभूत सुविधाही नसल्याने रुग्ण त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शासकीय चिकित्सा महाविद्यालय व इस्पितळात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या कोविड-१९ संक्रमित रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या व्हिडिओत रेखा अंधे नामक महिलेने महिला व पुरुषांना एकाच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याचा दावा केला आहे. वॉशरूम स्वच्छ नाही. चांगली प्रकृती असलेल्यांची तब्येत खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुदृढ नागरिकांना मारायचे आहे का, अशा वातावरणात दहा दिवस कसे काढणार, जेवणाचा दर्जा इतका खराब आहे की त्यामुळे प्रकृती खराब होत आहे. उत्तम आरोग्य असलेल्या नागरिकांना आजारी करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप यात केला गेला आहे.याच व्हिडिओमध्ये एका दुसऱ्या संक्रमित महिलेनेही आपली व्यथा सांगितली आहे. येथे १४ दिवसांपासून क्वारंटाईन आहोत. प्रकृती सामान्य असतानाही आणखी दहा दिवस येथे ठेवून काय साध्य होणार असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. शुभम नावाच्या संक्रमितानेही तो येथे वॉर्ड नंबर ११ मध्ये भरती असल्याचे सांगितले आहे. तो मुंबई मेडिकलमधून असल्याचे व्हिडिओत सांगतो. यांच्यासोबत अन्य संक्रमित महिला व पुरुषही आहेत. हे सर्व लोक हॉस्पिटलशी निगडित असल्याचे शुभम सांगतो. आमच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. तरीदेखील आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हाला भरती करण्यात आले आहे. मात्र, दोन दिवसांपासून कोणतीही सुविधा दिली जात नाही. ना चांगले जेवण ना चहा-नाश्त्याची व्यवस्था ना आम्हाला कुणी बघायला येत. यापेक्षा व्हीएनआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये असताना सर्व सुरळीत होते. जेवणाचा दर्जा अत्यंत निम्न आहे. त्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही. यापेक्षा उपाशी राहणे योग्य असून जेवण फेकण्यास मजबूर आहोत. बाथरूमची स्थिती अत्यंत घाण आहे. पाण्याची व्यवस्था नाही. इथे पाण्याचे दोन ड्रम आहेत. एकाचा उपयोग तोंड धुण्यासाठी तर दुसऱ्याचा बाथरूमकरिता करण्यास सांगितले गेले आहे. अशाने तर आम्ही आजारी पडू, अशी भीती शुभमने व्यक्त केली आहे.येथेच उपचार घेत असलेल्या मंगेशने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयात कॉल केला होता. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाचे नंबर देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने कंट्रोल रूमचा नंबर दिला. तेथून दुसरीकडचा नंबर मिळाला. अखेर कंटाळून मेडिकलच्याच डॉ. अर्चना वानखेडे यांच्याशी बोलणे झाले तर अशा दुरवस्थेस साफ नकार दिला आणि स्वत: येऊन चेक करण्याचे आश्वासन दिले. अशा तºहेने रुग्णांकडे कोणाचेच लक्ष नसून, त्यामुळे रुग्ण त्रस्त झाल्याचे मंगेशने व्हिडिओत सांगितले आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयViral Photosव्हायरल फोटोज्