शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची भूमिका मांडण्याचे वंजारी यांना अधिकार

By admin | Updated: June 16, 2017 02:03 IST

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद प्रदेश काँगे्रसकडे न नेता काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी माजी विरोधी पक्षनेते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद प्रदेश काँगे्रसकडे न नेता काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्यावर अविश्वास दर्शवून त्यांच्या जागी तानाजी वनवे यांची निवड केली आहे. या प्रकरणाची प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात काँग्रेसने यापूर्वीच मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. प्रदेश काँग्रेसने या प्रकरणात न्यायालयात पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांना दिले आहे. प्रदेश काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. गणेश पाटील यांनी वंजारी यांना याबाबतचे अधिकार पत्र दिले आहे. त्यानुसार वंजारी यांना न्यायालयात बाजू मांडण्याचे, प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे तसेच वकिलांची नेमणूक व वकीलनाम्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे. १६ मे रोजी काँग्रेसच्या बंडखोर गटाने बैठक घेतली. यात संजय महाकाळकर यांना बदलवून विरोधी पक्षनेतेपदी तानाजी वनवे यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार महाकाळकर यांना पदावरुन हटविण्याची मागणी बंडखोर गटाने विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी १६ सदस्यांचे पाठबळ असलेल्या तानाजी वनवे यांची नागपूर महापालिकेतील काँग्रेसच्या सदस्यांनी गटनेतेपदी केलेली निवड योग्य ठरविली होती. या निर्णयामुळे महाकाळकर यांना विरोधीपक्षनेते पदावरून पायउतार व्हावे लागले. महाकाळकर यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यात काँग्रेसनेही मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेतील काँग्रेसच्या स्वीकृत सदस्याची निवड प्रलंबित ठेवण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते आणि स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर मुत्तेमवार गटाची कोंडी करण्यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त व अनिस अहमद एकत्र आले होते. या राजकीय कलगीतुऱ्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची महापालिकेच्या स्वीकृ त सदस्यपदी निवडही अडचणीत आली आहे. बंडखोर नगरसेवकांना नोटीस बजावणारविरोधी पक्षनेते पदाचा वाद पक्षापुढे न नेता पक्षविरोधी भूमिका घेत बंडखोर गटाने तानाजी वनवे यांची या पदावर निवड केली. या प्रकरणाची प्रदेश काँग्रेस कमिटीने गंभीर दखल घेतली आहे. पक्षाच्या बंडखोर नगरसेवकांना लवकच नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.