शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वंजारी हत्याकांड :  कुख्यात शैलेष केदारेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:47 IST

युवा कंत्राटदार श्रीकांत वंजारी याचे अपहरण करून हत्या करणारा मुख्य आरोपी शैलेश केदारे याला अखेर हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी कारागृहातून ताब्यात घेतले. गेल्या दोन आठवड्यांपासून तो पोलिसांसोबत लपाछपी करीत होता.

ठळक मुद्देदोन आठवड्यांपासून पोलिसांशी लंपडाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवा कंत्राटदार श्रीकांत वंजारी याचे अपहरण करून हत्या करणारा मुख्य आरोपी शैलेश केदारे याला अखेर हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी कारागृहातून ताब्यात घेतले. गेल्या दोन आठवड्यांपासून तो पोलिसांसोबत लपाछपी करीत होता.कुख्यात शैलेश केदारे हा गँगस्टर संतोष आंबेकरचा भाचा आहे. तो खतरनाक गुंड असून, त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो खंडणी वसुलीसोबतच शहरातील विविध भागात अवैध सावकारीही करतो. गरीब कुटुंबातील श्रीकांत वंजारी इकडून तिकडून रक्कम जमवून इलेक्ट्रीक फिटींगच्या कामाचे कंत्राट घेत होता. एका कंत्राटाच्या पूर्ततेसाठी श्रीकांतने केदारेकडून काही रक्कम उधार घेतली होती. त्यातील बरीचशी रक्कम त्याने परत केली होती. मात्र, अव्वाच्या सव्वा व्याज आकारून त्या रकमेच्या वसुलीसाठी आरोपी केदारे आणि त्याच्या साथीदारांनी श्रीकांतमागे तगादा लावला होता. आर्थिक कोंडीमुळे श्रीकांत त्याला वेळ मागत होता. या पार्श्वभूमीवर, रक्कम वसूल करण्यासाठी केदारे तसेच त्याच्या टोळीतील गुंड साथीदार विक्की भोसले, अजिंक्य धोबड़े, सूरज राऊळ आणि आदर्श सातपुते तसेच अन्य आरोपींच्या मदतीने ५ मे रोजी श्रीकांत वंजारीचे अपहरण केले. त्याला चाकू, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या वंजारीचा ८ मे रोजी मृत्यू झाला.हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी केदारे आणि साथीदारांविरुद्ध अपहरण, हत्या करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. प्रारंभी विक्की भोसलेला अटक करण्यात आली. नंतर धोबडे, राऊळ आणि सातपुतेला पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी केदारे मात्र फरार होता. त्याला अटक करण्यासाठी पोलीस शोधाशोध करीत असताना केदारे २२ मे रोजी न्यायालयात पोहचला आणि त्याने या गुन्ह्यात आत्मसमर्पण केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्याला गुरुवारी प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे हुडकेश्वर पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र, कागदपत्रांना उशिर झाल्याने गुरुवारी त्याची अटक टळली. शुक्रवारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी कोर्टात हजर करून त्याच्या पीसीआरची पोलीस मागणी करणार आहेत.पोलिसांवर कुरघोडीपोलीस शोधाशोध करीत असताना न्यायालयात आत्मसमर्पण करून त्याने बुधवारी पोलिसांवर कुरघोडी केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या या कुरघोडीमागे कोण आहे, त्याचाही तपास चालविला आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक