शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भटकंती; मोहीम फत्ते... किल्ले राजगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:25 IST

एखाद्या इतिहासप्रेमीसाठी याहून अधिक सुखद भावना ती कुठली असेल...! राजगडाचा अगदी एकेक कानाकोपरा पाहायला दोन दिवससुद्धा अपुरे पडतील.

श्रिया सोमणनागपूर: बरोब्बर ६ वाजता निघायचं ठरवलं त्यामुळे ६:३० पर्यंत आमच्या मोहिमेची सुरुवात झाली. आता हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी सर करायची म्हणजे तयारीसुद्धा त्या तोडीची हवी. कामगिरी जोखमीची त्यामुळे तेवढा मावळेसुद्धा जमवायला हवे. तयारी तर झाली, आवश्यक ती शस्त्र, अवजारे, घोडे व दाणापाणी (मोबाईल, पॉवर बँक, कॅमेरा, स्कार्फ, बिस्कीटे आदी वस्तू) सगळं कसं एकदम अप टू डेट. महिनाभर अनेक जणांना घेऊन मोहिमेची आखणी करूनही प्रत्यक्षात मात्र तीनच मावळे जमले. पण 'कुणावाचूनही अडत नाही, आता श्वास घेऊ तो कामगिरी फत्ते करूनच', सरदारांनी (डॉ. स्नेहा चितळे) सिंहगर्जना केली आणि हर हर महादेव म्हणत भल्यापहाटे आम्ही गडाकडे कूच केले.हा हा म्हणता म्हणता उगवत्या सूर्याबरोबरच गेली अनेक शतकं अढळपणे उभ्या असलेल्या छत्रपतींच्या राजगडाचे प्रथमदर्शन झाले. गडाच्या आश्रयात वसलेल्या पाली गावात न्याहारीसाठी धारोष्ण नीरसं दूध मिळणं यापेक्षा अधिक मोठे सुख ते कोणते. राजगड समुद्रसपाटीपासून सुमारे १४०० मी. उंच आहे आणि पायथ्याशी वसलेल्या पाली गावातून पाली दरवाजाचा मार्ग हा राजमार्ग आहे आणि तो इतर मार्गाहून थोडा सोपा आहे. पण तरीही त्याने आमच्या नाकी दम आणला. हळूहळू ऊन वाढू लागले, एकीकडे घामाच्या धारा, थकलेले पाय. थोडं थांबावं म्हणत होते तर दुसरीकडे वर दूरवर फडकणारा भगवा थांबू देत नव्हता.मनात विचार आला नसता तरच नवल; आज आपल्याकडे अत्याधुनिक सुविधा (उदा. शूज, स्मार्टफोन) असूनही आपल्याला एवढा त्रास होतो तर त्या काळात लोकांनी दररोज गडावर जाणं, सामानाची ने-आण करणं कसं बरं जमवलं असेल. इतकंच नव्हे तर जिथे स्वत: चढून जाणं कठीण आहे तिथे राजस्त्रियांचे मेणे वाहून नेणारे भोई किती ताकदीचे असतील आणि इतका कठीण दुर्ग जिंकून घेणं आणि नंतर शत्रूंपासून त्याचे रक्षण करणं खरंच कल्पनेबाहेरचं आहे. तंत्रज्ञानामुळे माणूस दिवसेंदिवस अधू बनत चालला आहे हेच खरं.पाली दरवाजाने गडात प्रवेश केला आणि किल्ल्याच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या वाºयाने आमचा सारा थकवा दूर केला. राजगडाच्या चारही दिशांना एकतर डोंगर आहेत किंवा नदी आहे. वारा आणि पाऊस सोडल्यास कुणालाही परवानगीशिवाय प्रवेश अशक्य आहे. म्हणूनच सुरक्षेचे नैसर्गिक वरदान लाभलेल्या दुर्गराज राजगडाची निवड महाराजांनी राजधानी म्हणून केली असावी. कांदा, भाजी-भाकरी, पिठलं भात आणि झणझणीत ठेचा...अहाहा... नुसतं आठवलं तरी तोंडाला पाणी सुटेल असं जेवणं झाल्यावर उरलासुरला थकवाही दूर पळाला. ऐतिहासिकदृष्ट्या हा दुर्ग राजारामांचा जन्म, सईबाईंचा मृत्यू इ. घटनांचा साक्षीदार आहे. राजगडाची उंची आणि विस्तार यांचे शब्दांत वर्णन करणे खरोखरच अशक्य आहे. गडावर पद्मावती मंदिर व पद्मावती तलाव, बालेकिल्ला व इतर वास्तूंचे अवशेष आहेत. बालेकिल्ला हा कोणत्याही किल्ल्याचा मुख्य भाग असतो. बालेकिल्ला ज्याच्या ताब्यात त्याचा किल्ल्यावर हक्क. तिथे जायचा मार्ग कठीण व अरुंद चिंचोळा आणि उभ्या चढणाचा आहे. त्यामुळे तो चढणं तर खरोखरच अवघड आहे. मात्र ज्याने तो चढला त्याने खरा राजगड पाहिला. बालेकिल्ल्यावर अजूनही जशास तसा अखंड असा महादरवाजा, अतिशय सुंदर असा चंद्रकोर तलाव, जननी देवीचे मंदिर, ब्रह्मेश्वराचे मंदिर, उत्तर बुरुज, बाजारपेठ, दरबार, चावडी आणि न्हाणीघरांचे अवशेष आहेत आणि सर्वात वर राजवाड्याचे अवशेष आहेत. त्या राजवाड्यातून फिरताना कोणे एकेकाळी संभाजी महाराज इथे खेळले, बागडले असतील, राजाराम महाराज जन्माला येताच या वास्तूत चौघडे घुमले असतील. मोहिमेवर जाणाऱ्या शिवबांना जिजाऊंनी ओवाळले असेल, सईबाई पुतळा-सोयराबाईंनी चबुतऱ्यावर उभं राहून महाराजांची वाट पाहिली असेल, हात पाठी घेऊन महाराजांनी येरझाऱ्या घातल्या असतील, मुत्सद्दीपणे चर्चा केल्या असतील, मोहिमा आखल्या असतील... अगदी आता आपण जिथून फिरत आहोत तिथून महाराजही अनेकदा गेले असतील, या विचारांनीच अंगावर काटा आला.एखाद्या इतिहासप्रेमीसाठी याहून अधिक सुखद भावना ती कुठली असेल...! राजगडाचा अगदी एकेक कानाकोपरा पाहायला दोन दिवससुद्धा अपुरे पडतील. मात्र बालेकिल्ल्यावरून दुरून का होईना पण सर्व जागा पाहता येतात. हळूहळू मावळत्या सूर्याबरोबर आम्हीही परतीच्या वाटेला लागलो. चढण्यापेक्षा गड उतरणे जास्त कठीण वाटले. कदाचित दिवसभराचा थकवा आणि किल्ल्याला द्यावा लागलेला निरोप यांचा हा मिश्र परिणाम असावा. वाटेतल्या निसरड्या जागांमुळे स्वराज्याची साक्ष असलेल्या मातीशी आम्ही अगदी एकरूप झालो. गडाच्या पायथ्याशी काही मैलांवर जिथे सईबाईंची खरी समाधी आहे ती जागा मात्र वेळेअभावी पाहायची राहून गेली. असो, परत जाण्यासाठी काहीतरी कारण हवेच ना! सूर्याची ड्युटी संपली, आम्हीही मोहीम फत्ते केल्याचे भरभरून समाधान घेऊन परतीच्या वाटेला लागलो आणि तो अखंड अभेद्य दुर्गराज अंधारात गुडुप झाला.

टॅग्स :tourismपर्यटन