शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी, पारशिवनीचा मंगळवारी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:36 IST

वानाडोंंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) वानाडोंगरी व पारशिवनी येथे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनगर परिषद, नगर पंचायत निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वानाडोंंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) वानाडोंगरी व पारशिवनी येथे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण करण्यात आली आहे.या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र मतदान घेण्यात आले. त्यामुळे मंगळवारी नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा फैसला होणार आहे. वानाडोंगरी येथे गुरुवारी (दि. १९) तर पारशिवनी येथे रविवारी (दि. १५) नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मतदान घेण्यात आले. काही तांत्रिक कारणांमुळे वानाडोंगरी येथील पाच बुथवर रविवारी (दि. २२) पुन्हा मतदान घेण्यात आले. त्या पाचही बुथवर सरासरी ६३.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पावसाला सकाळपासूनच सुरुवात झाली होती, तरीही मतदारांचा उत्साह कायम होता.मतमोजणीची व्यवस्था वानाडोंगरी येथील शासकीय आयटीआयमध्ये करण्यात आली असून, तिथे पाच टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून, ती दोन राऊंडमध्ये पूर्ण केली जाईल. त्यासाठी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारशिवनी येथील मतमोजणी नगर पंचायतच्या नवीन कार्यालयात करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी चोख पोलीस बंदाबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर