शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

भिंत झाली फळा, फुटपाथ झाली शाळा!

By admin | Updated: March 18, 2016 03:01 IST

गुड इव्हिनिंग सर! माय नेम इज मनीषा. तुम्ही म्हणाल कोण आहे मनीषा? तुटक्या इंग्रजीत बोलते.

लहानग्यांना शिक्षणाचा लळा : गळतीवर विधायक उपायजितेंद्र ढवळे नागपूरगुड इव्हिनिंग सर! माय नेम इज मनीषा. तुम्ही म्हणाल कोण आहे मनीषा? तुटक्या इंग्रजीत बोलते. मनीषा लाल ही फुटपाथ शाळेत शिकते. कोणाशी कसे बोलायचे? कसे राहायचे? ही तिला शिकविले जात आहे. मनीषाला वडील नाही. आई हॉटेलमध्ये भांडी धुते. दिवसभर आई दिसत नाही. पण पहिल्या वर्गातील मनीषा आज मॅनर्सचे धडे गिरवीत आहे. अभ्यासाला ना म्हणणाऱ्या मनीषाला शाळेचा लळा लागला आहे. वर्गात मनीषाच्या शेजारी बसलेल्या महिमाही जन गण मन... म्हणते. महिमाचे वडील लग्नमंडपासमोर फुगे विकतात. रूपाही वन, टू, थ्री, फोर म्हणू लागली आहे. ती ‘खऱ्या’ शाळेत जात नाही!मनीषा, महिमा, रूपा, अजय, रूपेश आणि ओम गरिबांची ही मुले. झोपडी त्यांचे वैभव. अतिक्रमण कारवाई झाली की पुन्हा रस्त्यावर. शाळेत जाण्यासाठी स्कूल बस नाही. दुपारचा टिफिन नाही. या मुलांना शाळेतून आल्यावर मम्मीकडून सुकामेवाही मिळत नाही. पण या मुलांसाठी राजभवनची भिंत फळा झाली आहे आणि फुटपाथ त्यांची शाळा झाली आहे. ही शाळा रोज सायंकाळी ५ वाजता भरते. शाळेला सुरुवात होते ती ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता...’या प्रेरणा गीतापासून.रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या कानावर या मुलांचा बडबड गीतांचा गोड आवाज पडतो तेव्हा संवेदनशील मनाचा ब्रेकही काही क्षणासाठी तिथे लागतो. स्मार्ट होऊ पाहणाऱ्या नागपुरातील मुलेही स्मार्ट व्हावीत अशी सरकारची इच्छा आहे. पण आमच्या यंत्रणा आजही कागदावरच्या सर्वेत अडकल्या आहेत. पण ‘उपाय’ या स्वयंसेवी संस्थेने शाळेतील मुलांची गळती रोखण्यासाठी फुटपाथ शाळेचा विधायक उपाय शोधला आहे. सहा मुले का होईना गुरुजी त्यांची रोज हजेरी घेतात. उशिरा आला की त्यामागचे कारण समजून घेतात. बोटाची नखे आणि हात स्वच्छ आहे की नाही, हे आधी वर्गात आल्यावर पाहिले जाते. फुटपाथवरील या शाळेचे शिक्षकही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तेही या मुलांत रमले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी कसे दिसत होते? ज्या आंबेडकरांनी वंचितांच्या हक्कासाठी घटनेत शिक्षणाचा अधिकार सांगितला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? १०० रुपयाच्या नोटवर दिसणारे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहे. ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशी ओळख या मुलांना चित्रांच्या माध्यमातून करून दिली जाते. फुटपाथवर जीवन जगणाऱ्या या मुलांसोबत राहून विपरीत परिस्थितीत जीवन जगण्याचे कौशल्य मी शिकतो आहे. यांना शिक्षणाची आस आहे, पण आधार नाही. मी माझे कॉलेज करून तीन तास रोज या मुलांना शिकवतो. - निखील ढोरे, शिक्षक, माऊंट रोड फुटपाथ शाळा