शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

विना मास्क फिरा अन् दंड भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी/कुही : काेराेना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने लग्नसमारंभात केवळ ५० व्यक्तींना सहभागी हाेण्याची परवानगी दिली असून, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी/कुही : काेराेना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने लग्नसमारंभात केवळ ५० व्यक्तींना सहभागी हाेण्याची परवानगी दिली असून, त्यापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाल्यास मंगल कार्यालय मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले हाेते. काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोविड-१९ प्रतिबंधात्मक संयुक्त भरारी पथकाने कामठी व कुही तालुक्यात दंडात्मक कारवाई करीत २७ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल केला. ही कारवाई मंगळवारी (दि.२३) दुपारी करण्यात आली.

कोविड-१९ प्रतिबंधात्मक संयुक्त भरारी पथकाने मंगळवारी दुपारी कामठी तालुक्यातील खैरी ग्रामपंचायतच्या हद्दीतील काही मंगल कार्यालय, लाॅन, पानटपरी, हॉल, बीअरबार व कारखाने यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांना दुचाकी व चारचाकी वाहनचालक, पानटपरीजवळ उभे असलेले नागरिक, कामगार विना मास्क फिरत असल्याचे तसेच ते फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी संबंधितांवर तातडीने दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण १६ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल केला.

या पथकात नायब तहसीलदार श्याम कवठी, विस्तार अधिकारी श्रीकांत भिष्णूरकर, सरपंच मोरेश्वर कापसे, खैरी ग्रामपंचायतचे सचिव देवगडे, वीरेंद्र ठवरे, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत तांडेकर, लिपिक नीतेश मानकर यांचा समावेश हाेता. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे श्याम कवठी यांनी सांगितले.

महसूल व कुही नगर पंचायत प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी कुही शहराची पाहणी केली. यात पथकाने राेडवर विना मास्क फिरणारे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे नागरिकांचा बेशिस्त व बेफिकीरपणाही चव्हाट्यावर आला आहे. काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन न केल्यास संबंधितांवर कठाेर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार बाबाराव तीनघसे यांनी सांगितले. या पथकामध्ये नायब तहसीलदार उपेश अंबादे, रमेश पागोटे, कुही नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक देवाजी सडमेक, कर निर्धारण अधिकारी मिसाळ, मंडळ अधिकारी हिंदलाल उके, संग्राम खतवार, ऋषी तलमले यांचा समावेश होता.

...

तहसीलदारांकडे तक्रार

वारेगाव-खापरखेडा मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक खैरी गावाच्या दिशेने वळविली आहे. गावातून जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने तसेच बहुतांश नागरिक विना मास्क फिरत असून, ते फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने खैरी येथे काेराेना संक्रमण वाढण्याची शक्यता बळावली हाेती. त्यामुळे सरपंच माेरेश्वर कापसे यांनी या प्रकाराबाबत तहसीलदार अरविंद हिंगे व खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्याकडे तक्रार केली हाेती.

....

विद्यार्थ्यांच्या तासिकांवर प्रतिबंध

कुही शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग व तत्सम शैक्षणिक संस्थांवर विद्यार्थ्यांच्या तासिका घेण्यावर ७ मार्चपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. ऑनलाईन कामकाजाला मात्र परवानगी दिली आहे. साेबतच तालुक्यातील सर्व आठवडी बाजारांवर तसेच मंगल कार्यालय, सभागृह, लॉन, रिसॉर्ट, हॉटेल, सेलिब्रेशन हॉलमध्ये हाेणाऱ्या लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम व बैठका, राजकीय सभा व बैठका, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांचे सामने व क्रीडाविषयक कार्यक्रमांचे आयोजन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर ७ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.