चंद्रपूर : वेकोलि चंद्रपूर क्षेत्राच्या महाप्रबंधक कार्यालयातील उत्खनन विभागात कार्यरत अभियंता सीताराम तिवारी यांना गुरूवारी सकाळी ११ वाजता एका कंत्राटदाराकडून तीन हजारांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. सायंकाळी उशिरापर्यंंत कारवाई सुरूच होती. वेकोलि चंद्रपूर क्षेत्राच्या महाप्रबंधक कार्यालयाअंतर्गत उत्खनन विभागातील अधिकारी रजेवर असल्याने सदर अधिकार्याचा प्रभार अभियंता सीताराम तिवारी यांच्याकडे देण्यात आला होता. यादरम्यान, गोटे इंजिनिअरिंग या कंपनीचे बिल काढायचे होते. त्यासाठी सिताराम तिवारी यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. पैसे देण्याचे कबुल करून कंत्राटदाराने नागपूर येथील सीबीआय कार्यालयात यासंदर्भात तक्रार केली. ठरल्याप्रमाणे गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने येथील महाकाली कॉलरी परिसरातील महाप्रबंधक कार्यालयातील उत्खनन विभागात सापळा रचला. कंत्राटदाने सिताराम तिवारी यांना तीन हजार रुपयांची रक्कम देताच, पथकातील अधिकार्यांनी तिवारी यांना ताब्यात घेतले. गुरूवारी दिवसभर या पथकाकडून तिवारी यांची विचारपूस सुरू होती. सायंकाळी या पथकाने -दुर्गापूर-पद्मापूर परिसरात असलेल्या तिवारी यांच्या निवासस्थानावरही धाड टाकली.(प्रतिनिधी)
वेकोलिचा अभियंता लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात
By admin | Updated: June 6, 2014 00:52 IST