ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीचे निर्णय आणि शैलीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा लहान मुलगा विराटचा मोठा चाहता आहे. ‘माझा लहान मुलगा क्रिकेट खेळतो. मला नेहमी सांगतो की विराट बॅटिंगला आला की मला उठवा. ज्यावेळी विराट बाद होतो त्यावेळी तो लगेच आत जाऊन आपले काम करत बसतो. लहान मुलांमध्ये विराटची क्रेझ आहे. फारशी ताकद न लावता विराट ज्या पद्धतीने टायमिंग साधून फटकेबाजी करतो ते पाहण्यासारखे आहे, असे वॉनने एका मुलाखतीत सांगितले.
विराट बॅटिंगला आला की मला उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST