लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : शहरातील बसस्थानकाच्या आवारात दाेन वर्षापूर्वी स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले. या काळात त्याचे लाेकार्पण करण्यात न असल्याने सुसज्ज स्वच्छतागृह कुलूपबंद आहे. त्यामुळे महिला, तरुणी, वयाेवृद्ध व दिव्यांग प्रवाशांची माेठी गैरसाेय हाेत असल्याने या स्वच्छतागृहाचे लाेकार्पण नेमके करणार कधी, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
खापा (ता. सावनेर) हे मध्यवर्ती शहर असल्याने येथे परिसरातील गावांमधील शेतकरी, विद्यार्थी व इतर नागरिकांचा सतत राबता असताे. शिवाय, या ठिकाणाहून नागपूर-रामटेक, नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश), नागपूर-अमरावती मार्गाने प्रवास करणारे प्रवासीही काही काळ थांबतात. येथील बसस्थानकाच्या आवारात इतर व दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचे बांधकामही करण्यात आले. परंतु, ते कुलूपबंद असल्याने त्याचा प्रवाशांना वापर करता येत नाही.
या बसस्थानकाचे बांधकाम २० वर्षांपूर्वी करण्यात आले. याेग्य देखभाल व दुरुस्तीअभावी बसस्थानकाच्या भिंतींना तडे गेले असून, त्यात झाडे वाढली आहेत. अशाही अवस्थेत या बसस्थानकाची जुजबी दुरुस्ती करून रंगरंगाेटी करण्यात आली. परंतु, त्यावर बसस्थानक, फलाट क्रमांक व इतर सूचना लिहिण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील सर्व समस्यांची साेडवणूक करून प्रवाशांसाठी स्वच्छतागृह खुले करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
पिण्याच्या पाण्याचा अभाव
या बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची अद्याप काेणतीही साेय करण्यात आली नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशाला पिण्याच्या पाण्यासाठी आवाराबाहेर असलेल्या हाॅटेल व पानटपरींवर जावे लागते. या बसस्थानकाच्या आवारात काहींनी अतिक्रमण केले असून, झुडपी जंगल वाढले आहे. ते साफ करण्याची व आवार अतिक्रमणमुक्त करण्याची तसदी कुणी घेत नाही. या जागेचा वापर दुकानांचे गाळे बांधण्यासाठी हाेऊ शकताे. त्यातून एसटी महामंडळाला उत्पन्नही मिळू शकते.
170721\img20210717083200.jpg
खापा येथील बसस्थानक फोटो