शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

सेवानिवृत्तांना पेन्शनची प्रतीक्षा

By admin | Updated: June 10, 2017 02:30 IST

जून महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जमा झालेली नाही.

इपीएफ कार्यालयाच्या चकरा मारून त्रस्त : आठवडा उलटल्यानंतरही खात्यात रक्कम नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जून महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जमा झालेली नाही. साधारणत: महिन्याच्या पहिल्या तारखेला पेन्शन त्यांच्या खात्यात जमा होऊन जाते. महिन्याची ९ तारीख झाल्यानंतरही खात्यात पेन्शनची रक्कम जमा न झाल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. पेन्शनची राशी खात्यात जमा न झाल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी गेल्या आठवड्यापासून भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाचे चक्कर मारत आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून कुठलीही ठोस माहिती त्यांना दिली जात नाही. पेन्शनला उशीर झाल्याचे कुठलेही कारण त्यांना दिले जात नाही. यासंदर्भात लोकमतने इपीएफओच्या नागपूर कार्यालयातून माहिती घेतली. त्यात खुलासा झाला की पेन्शनधारकांकडून जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांनी जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तरीही त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झालेली नाही. पेन्शनची रक्कम जमा न झाल्यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमुळे देशभरातील कर्मचाऱ्यांच्या २०१५-१६ च्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेच्या व्याजाची राशी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नव्हती. जेव्हा की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएफच्या व्याजाची रक्कम अपलोड करण्यात आली होती. एसएमएसच्या माध्यमातून त्याची माहितीही देण्यात आली होती. पीएफ कार्यालय वेबसाईटला युनिकोडमध्ये ट्रान्सफर करण्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकले नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेता, पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.