शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘वाहो गुरु गोविंदसिंहजी’ने उत्तर नागपूर दुमदुमले

By admin | Updated: December 26, 2016 02:49 IST

दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेतर्फे व समूह संगतच्या सहकार्याने

प्रकाशपर्वानिमित्त नगरकीर्तन शोभायात्रा नागपूर : दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेतर्फे व समूह संगतच्या सहकार्याने उत्तर नागपुरात भव्य नगरकीर्तन शोभायात्रा काढण्यात आली. यात समूह संगतच्या महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. धर्मरक्षणासाठी आपले सर्वस्व त्यागून महान योद्धा आणि गुरु गोविंदसिंहजी यांचे ३५० वे प्रकाशपर्व संपूर्ण देशात श्रद्धा आणि उत्साहात साजरे करण्यात येत आहे. नागपुरातही गुरु गोविंदसिंहजी यांच्या स्मृतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून प्रकाशपर्व साजरे करण्यात येत आहे. रविवारी नगरकीर्तनाने उत्तर नागपुरातील सर्व गुरुद्वारांना भेट देऊन गुरुजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. रविवारी सकाळी गुरुद्वारा सिंह सभेत विशेष अरदास करून गुरुग्रंथ साहिबला फुलांनी सजविलेल्या रथावर ठेवण्यात आले. त्यानंतर नगारे, बँडच्या धुमधडाक्यात नगरकीर्तन रवाना झाले. नगरकीर्तन शोभायात्रा कामठी मार्गाने कडबी चौक, मेकोसाबाग, जरीपटका मुख्य बाजार, कलगीधर सत्संग मंडळ, भीमचौक, पाटणकर चौक, दीपकनगर, बाबा बुड्ढाजीनगर, बुद्धनगर या मार्गाने गुरुद्वारा श्री गुरुनानक दरबार गुरुनानकपुरा येथे पोहोचली. तेथे अरदासनंतर नगरकीर्तनाचा समारोप झाला. त्यानंतर सर्वांनी लंगरचा आनंद घेतला. नगरकीर्तन शोभायात्रेत सर्वात पुढे नांदेड साहेब येथून आणण्यात आलेले ११ घोडे शोभायात्रेच्या अगदी समोर होते. सोबतच अमृतसर येथून आलेले पाचवे तख्त शिरोमणी अकाली बुढ्ढादलाचे ‘निहंगसिंह’ चालत होते. दलाचे नेतृत्व १५ वे मुखी सिंह साहेब जत्थेदार बाबा प्रेमसिंह करीत होते. मार्गात निहंगसिंह वीरांनी शोभायात्रेच्या मार्गात शस्त्रविद्येचे सादरीकरण केले. यात पट्ट्यांनी लढाई, तलवारबाजीचा समावेश होता. काही सदस्य घोड्यावर बसून नगारा वाजवित होते. शोभायात्रेत शीख संस्कृतीचे दर्शन झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) जागोजागी पुष्पवर्षाव नगरकीर्तन शोभायात्रेच्या मार्गात विविध संस्थांनी पुष्पवर्षाव करून शोभायात्रेचे स्वागत केले. मार्गात ठिकठिकाणी प्रसादाचे वितरण करण्यात आले. जरीपटका येथे कलगीधर सत्संग मंडळाचे संयोजक अ‍ॅड माधवदास ममतानी यांच्या नेतृत्वात सहजधारी संगतने स्वागत केले. गुरु ग्रंथसाहिबला मानणाऱ्या गैरशीख भाविकांना सहजधारी म्हणण्यात येते. ममतानी यांनी सहजधारींना गुरुग्रंथ साहिबाचे दर्शन करवून जरीपटका येथे आणल्याबद्दल संगतचे आभार मानले. त्यानंतर कलगीधर सत्संग मंडळाच्या युवा संगतने छोले-पुरी, पाण्याचे वितरण केले.