शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आपली बस कंडक्टर व चालकांना पाच हजाराची वेतनवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 21:20 IST

महापालिकेच्या आपली बस सेवेतील कंडक्टर व चालकांना नियमानुसार वेतन मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला एक कोटींचा बोजा वाढणार आहे.

ठळक मुद्देमनपावर महिन्याला एक कोटीचा अतिरिक्त बोजा : परिवहन विभागाच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बस सेवेतील कंडक्टर व चालकांना नियमानुसार वेतन मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला एक कोटींचा बोजा वाढणार आहे. कंत्राटदारांसोबत केलेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन, पगारी साप्ताहिक रजा, वर्षाला १५ पगारी रजा, आठ तासाहून अधिक काम केल्यास ओव्हरटाईम देण्याबाबतचा निर्णय सोमवारी परिवहन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास पाच हजारांची वाढ होणार आहे.परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही पार पडली. यावेळी उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, परिवहन विभागाचे श्रम अधिकारी अरूण पिपरूडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, लेखा अधिकारी विनय भारव्दाज सुकीर सोनटक्के यांच्यासह बस ऑपरेटर उपस्थित होते.किमान वेतन मिळावे, तक्रार सुनावणीसाठी कक्ष निर्माण करावा, नियमानुसार आठवड्याला पगारी रजा, ८ तासाहून अधिक काम केल्यास ओव्हर टाईम देण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत बोरकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. आठवडी परिवहन विभागाच्या कंडक्टर व चालकांवर अन्याय होणार नाही, त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही बोरकर यांनी दिली.कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुटीबाबतचे परिपत्रक आठ दिवसात सादर करा, वर्षाला १५ पगारी रजा संदर्भात एक धोरण निश्चित करून पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश बोरकर यांनी दिले. किमान वेतन कायदा व औद्योगिक कामगार कायद्यात या बाबींचा समावेश आहे. परंतु मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित होती. यामुळे कर्मचाºयांत असंतोष होता. तिकीट चोरीचे प्रमाण वाढले आहे. आंदोलनाचाही इशारा दिला होता.चौकशीसाठी समितीविना तिकीट प्रवासी आढळून आल्यास त्यावर सुनावणी न करता तात्काळ निलंबित केले जात होते. परंतु यात निर्दोष कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे विना तिकिट प्रवासी प्रकरणाची चौकशी व सुनावणी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. यात रवींद्र पागे, अरुण पिपरूडे व सूर्यकांत अंबाडेकर यांचा समावेश राहणार आहे. चौकशीनंतर १५ दिवसात प्रवासी रक्कम व दंड वसूल करून संबंधित कंडक्टरला कामावर घेतले जाणार असल्याचे नरेंद्र बोरकर यांनी सांगितले. चौथ्यांना विना तिकीट प्रवासी आढळल्यास संबंधित कंडक्टरला निलंबित के ले जाईल, अशी माहिती बोरकर यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus DriverबसचालकPublic Transportसार्वजनिक वाहतूक