शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पहिल्यांदाच निवडणुकीत होणार व्हीव्हीपॅटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 21:33 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल) या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बेंगलुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देनागपूर-रामटेक मतदारसंघासाठी ५,४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे आलीप्रथमस्तरीय तपासणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल) या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बेंगलुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत.जिल्ह्यातील रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदार संघात ४ हजार ३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून या सर्व मतदार संघावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतले जाणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ४ हजार ३३६ बॅलेट युनिट, ५ हजार ४८६ कंट्रोल युनिट व ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट ही नवीन (एम) तीन मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. नवीन एम तीन मतदान यंत्रे केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या बंगळुरूया कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटसह प्रथमच व्हीव्हीपॅट(व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल)चा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणार असून मतदानाच्यावेळी मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिटसोबत व्हीव्हीपॅट जोडलेले राहील. मतदानाच्यावेळी मतदार जेव्हा मतदान करतील तेव्हा व्हीव्हीपॅटचे स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत एक पेपरस्लीप डिस्प्ले होईल. त्यानंतर पेपरस्लीप व्हीव्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समध्ये जमा होईल. मतदारांना ही स्लीप सोबत नेता येणार नाही. या स्लीपमध्ये उमेदवाराचा बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक, नाव व निवडणूक चिन्ह मुद्रित झाले असेल, अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्याच उमेदवाराला मत पडले आहे याची खात्री मतदार करू शकतो.निवडणुकीपूर्वी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रापैकी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट ही प्रथमस्तरीय तपासणी १२ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या प्रशिक्षित अभियंत्यांकडून करण्यात येत आहे. प्रथमस्तरीय तपासणीदरम्यान योग्य आढळून आलेली मतदान यंत्रेच निवडणुकीसाठी वापरण्यात येतील. तसेच नादुरुस्त आढळून येणारी यंत्रे कंपनीकडे परत पाठविण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी माहिती करून घ्यावीया मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी सुरू असून राजकीय पक्षांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहून व्हीव्हीपॅटबद्दल माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. व्हीव्हीपॅटसह मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी कळमना मार्केट येथील वेअर हाऊसिंग गोडाऊन विंग-सी येथे पोलीस सुरक्षेत कार्यालयीन वेळात सुरू आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीnagpurनागपूर