शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महिलांची मतदानाची टक्केवारी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:43 IST

निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. महापालिकेच्या दहा झोनमधील अशा दहा मतदान केंद्राची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. याचा विचार करता मतदानाविषयी महिला मतदारात अधिक जागृती करण्याची गरज असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देलोकशाही पंधरवडानिमित्त मतदार नोंदणी : टक्केवारी कमी अससेल्या भागात जनजागृतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. महापालिकेच्या दहा झोनमधील अशा दहा मतदान केंद्राची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. याचा विचार करता मतदानाविषयी महिला मतदारात अधिक जागृती करण्याची गरज असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधरवड्याचे आयोजन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या दरम्यान शहरात विविध ठिकाणी आणि विविध माध्यमातून मतदार नोंदणी करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. यावेळी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सहायक आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.शाळा, महाविद्यालये यासह शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये आदींसह सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक युवक-युवतीने मतदार यादीत नाव नोंदवावे, ज्यांनी अद्यापही मतदार यादीत नाव नोंदविले नसेल अशा नागरिकांनीही नाव नोंदणी करावी, यासाठी व्यापक प्रमाणावर लोकशाही पंधरवड्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ही जनजागृती बॅनर्स, होर्डिंग्स, रेडिओ जिंगल्स, टीव्ही, केबल, वर्तमानपत्र आदींच्या माध्यमातून करण्यात येईल. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, विविध सार्वजनिक कार्यक्रमात स्टॉल्स लावून मतदार नोंदणीविषयी माहिती देण्यात येईल. शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय व अन्य ठिकाणी ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावर चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात येईल. २६ जानेवारी रोजी नागपूर शहरात होत असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांच्या ध्वजवंदन कार्यक्रमात सर्व प्रमुख वक्तांच्या भाषणांमध्येही लोकशाही पंधरवड्यादरम्यान द्यावयाचा संदेश अंतर्भूत करण्यात येईल.जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्रलोकशाही पंधरवड्यात मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील विविध महाविद्यालयात मतदार नोंदणीची माहिती देणारे स्टॉल्स ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मतदार नोंदणीचे फॉर्मसुद्धा भरून घेण्यात येतील. मतदार नोंदणी करणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. महाविद्यालयांमध्ये सेल्फी कॉर्नर उभारण्यात येईल. ‘मी मतदार यादीत नाव नोंदविणार’ असा फलक घेऊन विद्यार्थी सेल्फी काढतील.ऑरेंज फेस्टिव्हलदरम्यान स्वाक्षरी मोहीममहापालिकेच्या वतीने लोकशाही पंधरवड्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पूर्वतयारी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. फुटाळा तलाव येथे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलदरम्यान स्वाक्षरी मोहीम, वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या युथ एम्पॉवरमेंट समीटमध्ये मतदार जागृतीसंदर्भात स्टॉल लावण्यात आला. सेल्फी कॉर्नर तयार करून युवा वर्गाला मतदार नोंदणीबाबत सांगण्यात आले. महिला उद्योजिका मेळाव्यात स्टॉल, सेल्फी कॉर्नर, मतदार जागृतीचा संदेश असलेला बलून आकाशात सोडण्यात आला. कमला नेहरू महाविद्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमात लोकशाही पंधरवड्याबाबत माहिती देण्यात आली. खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान प्रतापनगर येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावरही तेथे उपस्थितांना लोकशाही पंधरवड्याबाबत माहिती देण्यात आली.

 

टॅग्स :Nanda Jichakarनंदा जिचकारWomenमहिला