शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

केलेल्या कामावर काँग्रेसला मतदान करा : सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 14:07 IST

आजवर कामांची पावती म्हणून मतरुपी आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले. ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलत होते.  

नागपूर : जानेवारी २०२० ला झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील सुज्ञ जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून एकहाती सत्ता दिली. या मतरुपी आशीर्वादाचा स्वीकार करून जिल्हा परिषरदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य लोकोपयोगी कामाला लागले. यात कोरोनाकाळात केलेली आरोग्याची कामे ही प्रमुख आहेत, या कामांची पावती म्हणून मतरुपी आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. केदार यांनी कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव, तेलकामठी, तिष्टी, लोहगड, सवंद्री, कोहळी, म्हसेपठार, मांडवी इत्यादी गावांत प्रचार दौरा केला. ओबीसी आरक्षणामुळे होऊ घातलेली ही पोटनिवडणूक भाजपची देण आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेदरम्यान राज्यशासनाने केंद्र सरकारला जातिनिहाय डेटा मागितला असता तो केंद्राने सदर डेटा न दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. यामुळे भाजपचा ओबीसी विरोधी चेहरा हा जनतेपुढे आला असल्याची टीका त्यांनी केली.

देशाची प्रगती काही एका दिवसात झालेली नाही, यात शेतकरी,कष्टकऱ्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, आज त्यांचीच विटंबना भाजप शासन करीत आहे. परंतु, आता भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचेही केदार यावेळी म्हणाले. 

टॅग्स :ElectionनिवडणूकSunil Kedarसुनील केदार