शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी ‘रँकिंग’मध्ये ‘व्हीएनआयटी’ देशात ३० व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:11 IST

नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात ...

नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या ६० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा सर्व संस्थांच्या रँकिंगमध्ये देशात ५४ वा क्रमांक आहे. अभियांत्रिकी संस्थांत ३० वा तर आर्किटेक्चर संस्थांत १७ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ अभियांत्रिकी गटात २७ व्या स्थानावर होते. विशेष म्हणजे देशातील अव्वल संस्थांमध्ये व्हीएनआयटीला स्थान मिळाले आहे. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नसला तरी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये ‘रँकिंग’ मिळाले आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. व्हीएनआयटी वगळता इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. मागील वर्षी अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज)११३ वा होता. यंदा हा क्रमांक ११९ इतका आहे. जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय (१३०), लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१३६), यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (१४९) यांना पहिल्या १५० मध्ये स्थान आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रँकिंग’मधून स्पष्ट होत आहे.

‘फार्मसी’त पहिल्या शंभरात ३ संस्था

देशातील ‘टॉप’ फार्मसी महाविद्यालयांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी’ ला ४६ वे ‘रँकिंग’ मिळाले आहे. नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर फार्मसी विभाग व दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेज ५१ ते १०० या बॅन्डमध्ये आहेत.

शासकीय विज्ञान संस्थेची भरारी

दरम्यान, शासकीय विज्ञान संस्थेची कामगिरी यंदा चांगली राहिली. देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या गटात शासकीय विज्ञान महाविद्यालयाचा ६१ वा क्रमांक आहे. तर शासकीय फॉरेन्सिक विज्ञान संस्थेचा ८८ वा क्रमांक आहे. नागपुरातील सर्वात जुन्या संस्थांमध्ये शासकीय विज्ञान संस्थेची गणना होते.

नागपूर विद्यापीठाच्या पदरी परत निराशा

‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र पहिल्या शंभरात ‘रँकिंग’ मिळविण्यात यश आलेले नाही. देशपातळीवर विद्यापीठ १५१ ते २०० या क्रमांकांमधील विद्यापीठांमध्ये आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ पहिल्या शंभरात स्थान मिळाले आहे.

आयआयएमच्या रँकमध्ये सुधारणा नाही

२०२० मध्ये आयआयएम-नागपूर व्यवस्थापन संस्थांच्या गटात ४० व्या क्रमांकावर होते. यंदादेखील तोच क्रमांक आहे. यंदा आयआयएमच्या रँकमध्ये सुधारणा झाली नाही. आयएमटीचा ७६ ते १०० या बँडमध्ये समावेश आहे.