शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

लावणीसम्राज्ञीची व्यथा ‘विठाबाई’

By admin | Updated: November 20, 2014 01:03 IST

महाराष्ट्रातील शाहिरी लोकसंगीताला दीर्घकालीन पूर्व परंपरा असली आणि सामान्य जनमानसात लोकप्रियताही लाभली असली तरी तथाकथित उच्चभ्रू समाजात मात्र लोकसंगीताला अपवादानेच प्रतिष्ठा मिळाली आहे.

राज्य नाट्य महोत्सव : अंकुर मानव समाज उत्थान केंद्राचे सादरीकरण नागपूर : महाराष्ट्रातील शाहिरी लोकसंगीताला दीर्घकालीन पूर्व परंपरा असली आणि सामान्य जनमानसात लोकप्रियताही लाभली असली तरी तथाकथित उच्चभ्रू समाजात मात्र लोकसंगीताला अपवादानेच प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यात तमाशाच्या फडातील लावणी नृत्यांगना आणि सहकलावंतांचे जीवन म्हणजे पाण्यावरची रेघच आहे. तमाशातील लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या लौकिक यश, कीर्ती आणि अलौकिक लोकप्रियेसह त्यांची संघर्षमय कथा साकारणारे नाट्य म्हणून संजय जीवने यांच्या ‘विठाबाई’ या नाटकाचा उल्लेख करावा लागेल. आज हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शनही संजय जीवने यांनीच केले होते. रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे दमदार सादरीकरण होते. चाकोरीबाहेरचा विषय समर्थपणे साकारण्यात कलावंत कुठेही कमी पडले नाही. विठाबार्इंच्या वास्तविक जीवनाचा आलेख नेमकेपणाने उलगडून दाखविणाऱ्या वंदना जीवने यांचे आत्मकथन आणि लावणीसम्राज्ञीला साकारणारी सांची जीवने यांचे विशेष कौतुक करावे लागेल. विठा म्हणजेच नृत्य असे समीकरण असलेल्या या प्रतिभावान नृत्यांगनेला तमाशातील कलावंतच समजले गेले. तमाशावर पोट भरणाऱ्या सहकलावंतांसाठी भल्याबुऱ्या कुठल्याही परिस्थितीत न थकता पावलातील घुंगरू तुटेपर्यंत नाचणाऱ्या आणि आलेल्या संकटांशी धैर्याने सामना करणाऱ्या विठाबाई भारतीय जवानांचे मनोरंजन करण्यासाठीही गेल्या. नाटकातील प्रसंग, लावणी नृत्ये, अभिनय यामुळे सर्वांनीच कलावंतांना दाद दिली. यात सांची जीवने, वंदना जीवने, संजय जीवने, ललित गायकवाड, रोशन श्रीवास्तव, अभिजित मून, मिलिंद कोटंबे, भोजराज हाडके, हरीश गवई, संदीप मून, उज्ज्वल भगत, अनिकेत कांबळे, सदिच्छा जिलटे, लुंबिनी आवळे, गौरी सोनटक्के, रितीका बावणे, रुणाली कांबळे, जुई गडकरी, सायली तुपे, साक्षी शिरभैये यांनी भूमिका केली. संगीत सोना बहुरूपी यांचे होते.संवादिनी श्रुती पांडवकर, हलगी अभिलाष बागडे आणि कांचन घाटोळे, गायन सोना बहुरूपी, भूषण जाधव आणि मोनिका भोयर यांनी केले. प्रकाशयोजना मिथून मित्रा, नेपथ्य संदीप हमदापूरकर, नाना मिसाळ, बाबा खिरेकर, प्रीती तुपे, मनीष पाटील, रोशन श्रीवास्तव यांचे होते. निर्मिती सुरेंद्र आवळे आणि निर्मिती सहायक मनोज रंगारी, प्रमोद कोटंबे, सायली तुपे, प्रणिता जांगळेकर, दामिनी आणि बानाई यांनी केले होते. (प्रतिनिधी)