कोरोनामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा असो की, स्थायी समितीच्या बैठका ऑनलाईन सुरू झाल्या. नगरसेवकांच्या बोलण्यावर मर्यादा आल्या. नेटवर्क व तांत्रिक अडचणी यामुळे नगरसेवक त्रस्त झाले. असे असले तरी या निमित्ताने ऑनलाईनला महत्त्व आले.
...
गरीब विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. परंतु मनपा शाळांत स्लम भागातील गरीब व मध्यमवर्गीय मुले शिक्षण घेतात. ऑनलाईन शिक्षणासाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला.
...
सोशल मीडियावर मुंढेंचा बोलबाला
सोशल मीडियात हातखंडा असलेल्या भाजपला तुकाराम मुंढे भारी ठरले. यामुळे मनपातील पदाधिकाऱ्यांना मुंढे प्रेमींच्या रोषणाला सामोरे जावे लागले. मुंढे नागपुरात असेपर्यंत शोसल मीडियावर त्यांचा चांगलाच बोलबाला होता. यामुळे सत्ताधारी मेटाकुटीस आले होते.
....
बांगर, मुंढे गेले, राधाकृष्णन बी. आले!
मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची बदली झाली. तुकाराम मुंढे यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे आली. मनपातील पदाधिकारी व आयुक्त यांच्या वादात मुंढे यांचीही बदली झाली. राधाकृष्णन बी. आलेत. त्यांनी कोविड काळात योग्य नियोजन केले.
.....
२७३१ कोटींचा अर्थसंकल्प
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार विजय झलके यांनी स्विकारला. महापालिकेची आर्थिक रुळावर आणण्यासोबतच शहरातील विकास कामांना निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी यांनी २०२०-२१ या वर्षाचा २७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.
............
विकासासाठी निधी नाही
महापालिकेचा दर महिन्याला ११० ते १२० कोटींचा आवश्यक खर्च असून उत्पन्नही जवळपास तितकेच आहे. यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले. वेतन, पेन्शन, कर्जपरतफेड व अन्य आवश्यक खर्च केल्यानंतर निधी शिल्लक राहत नाही. यामुळे विकास कामासाठी निधी शिल्लक राहात नाही.
...