शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

उपराजधानीत ‘सायबर’ गुन्ह्यांचा ‘व्हायरस’ वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:08 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या जमान्यात सायबर गुन्हेगारी डोकेदुखी बनू लागली आहे. इतर मोठ्या शहरांसोबतच ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सबकुछ ऑनलाइनच्या जमान्यात सायबर गुन्हेगारी डोकेदुखी बनू लागली आहे. इतर मोठ्या शहरांसोबतच उपराजधानीत देखील सायबर गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये गुन्ह्यांची संख्या १०४ टक्क्यांनी वाढली. सायबर गुन्हेदरात नागपूरचा क्रमांक देशात आठवा होता. तर प्रलंबित पोलीस चौकशीची टक्केवारी राज्यात सर्वाधिक होती. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

२०२० साली नागपुरात सायबर गुन्ह्यांचे २४३ गुन्हे दाखल झाले. २०१९ मध्ये हाच आकडा ११९ इतका होता. २०२० मधील तब्बल १४१ गुन्हे हे फसवणुकीचे होते, तर २३ गुन्हे महिलांची छळवणूक करण्याचे होते. सोबतच घोटाळ्याच्या ४ गुन्ह्यांची नोंद झाली. विविध गुन्ह्यांसाठी एका महिलेसह एकूण ३९ जणांना अटक करण्यात आली.

पोलीस चौकशीची गती संथच

सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांची चौकशी संथ गतीने होत असल्याचे चित्र असून २०२० साली नागपूरचा प्रलंबित प्रकरणांची टक्केवारी ही राज्यात सर्वाधिक होती. पोलिसांकडून चौकशीसाठी २०२० मधील २४३ तर अगोदरची ३०९ प्रकरणे होती. ३० प्रकरणातच आरोपपत्र दाखल होऊ शकले. ८० प्रकरणांतच चौकशी पूर्ण होऊ शकली तर वर्षाअखेरीस ४७१ प्रकरणांत चौकशी प्रलंबित होती. चौकशी प्रलंबित असण्याची टक्केवारी ८५.३ टक्के इतकी होती. ही टक्केवारी राज्यात सर्वात जास्त ठरली. मुंबईचा आकडा ८३.६ टक्के तर पुण्याची टक्केवारी ८२.८ टक्के इतकी होती.

लैंगिक छळवणुकीसाठी ४६ गुन्हे

विविध कारणांमुळे संताप आल्याने सायबर क्राईमचे ७० गुन्हे घडले. तर महिला व मुलींची लैंगिक छळवणूक करण्याचा उद्देश असलेले ४६ गुन्हे दाखल झाले. १०१ प्रकरणांत आरोपींचा उद्देश हा केवळ घोटाळा करणे हाच होता.

दोषसिद्धीचे प्रमाण शून्य

न्यायालयात सायबर क्राईमचे ३० खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालिन दाखल अशा २०५ खटल्यांवर सुनावणी झाली. यात एकालाही शिक्षा झाली नाही. वर्षाअखेरीस सर्वच २०५ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित होती व दोषसिद्धीचा दर शून्य इतका होता. १०० टक्के प्रकरणे प्रलंबित होती व देशात हा दर सर्वात जास्त होता.

वर्षनिहाय गुन्हे

वर्ष-गुन्हे

२०१७ - ८२

२०१८ - १०६

२०१९ - ११९

२००२ - २४३

सायबर गुन्ह्यांमागील उद्देश

उद्देश – गुन्ह्यांची संख्या

सूड – ०१

संताप – ७०

घोटाळा – १०१

खंडणी – ०५

इभ्रतीला धक्का – ०८

खोडी – ०८

लैंगिक छळवणूक – ४६

इतर - ०४