शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

व्हीआयपी सुरक्षेत तैनात जवानाची नागपुरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:20 IST

व्हीआयपी तसेच नेत्यांच्या सुरक्षेत तैनात स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या जवानाने आपल्या सर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी एमआयडीसीतील दाते ले-आऊट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभाग हादरले आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

ठळक मुद्देसर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर झाडली गोळी : एमआयडीसीतील घटना, पोलीस हदरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीआयपी तसेच नेत्यांच्या सुरक्षेत तैनात स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या जवानाने आपल्या सर्व्हीस पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी एमआयडीसीतील दाते ले-आऊट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस विभाग हादरले आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. विनोद भगवान धिवांदे (२९) असे मृत जवानाचे नाव आहे.विनोद हा दाते ले-आऊट येथे पत्नी प्रियंका, अडीच वर्षाची मुलगी त्रिसा आणि आई-वडीलांसोबत राहत होता. तो एसआरपीमध्ये तैनात होता. वर्षभरापूर्वीच त्याला प्रतिनियुक्तीवर एसपीयूमध्ये तैनात करण्यात आले होते. व्हीआयपी आणि महत्त्वपूर्ण नेते नागपुरात असल्यावर एसपीयूचे अधिकारी आणि जवानांना ड्युटीवर लावले जाते. उर्वरित वेळी ते ‘रिजर्व्ह’ असतात. विनोद मंगळवारी रात्री घरी आला नव्हता. त्याची सासुरवाडी घराजवळच आहे. ते रात्री सासरीच झोपला. बुधवारी सकाळी ११.१५ वाजता तो घरी आला. त्याला नशेत पाहून पत्नी प्रियंकाने दारु पिण्याचे कारण विचारित सल्ला देऊ लागली. परंतु त्याने तिला कुठलही प्रतिसाद दिला नाही. ‘माझे एटीएम कार्ड तुझ्या घरी राहिले’ असे सांगत तिला एटीएम कार्ड आणण्यासाठी सासरी पाठवले. यानंतर विनोद आपल्या बेडरूममध्ये गेला. त्याचे आई-वडील हॉलमध्येच बसले होते.विनोदने बेडरूममध्ये जाऊन आपली सर्व्हीस पिस्तुल काढली आणि आपल्या कानपटीवर लावून गोळी झाडली. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. गोळीचा आवाज एकताच आईवडील धावत बेडरुमध्ये आले. त्यांना विनोद रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी लगेच शेजारी व नातेवाईकांना सूचना दिली. यानंतर एमआयडीसी पोलीसांना सूचना देण्यात आली. एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विनोदचा मृतदेह मेडिकलला रवाना करीत सर्व्हीस पिस्तुल जप्त केली.व्हीआयपी सुरक्षेत तैनात जवानाने आत्महत्या केल्यामुळे पोलीस अधिकारीही घटनास्थळीही पोहोचले. विनोदचा सुसाईड नोट सापडेल या अपेक्षेने त्याच्या घरात शोधाशोधही करण्यात आली. परंतु काहीही हाती लागले नाही. विनोदचा भाऊही एसआरपीत आहे. पोलिसांनी नातेवाईकांची विचारपूस केली. तेही आत्महत्येचे कारण सांगू शकले नाही. त्याच्या साथीदारांनी कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केल्याची शंका व्यक्त केली आहे. परंतु जवळच्या लोकांनी मात्र कौटुंबिक कलहाची बाब नाकारली आहे.मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका विनोदच्या मामाची मुलगी आहे. चार वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्यात कुठलाही वाद नव्हता. मानसिक धक्क्यात असल्याने पोलीसही कुटुंबीयांची सखोल विचारपूस करू शकले नाही. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. 

  धोका ओळखू शकला नाही मित्र  घटनेच्या वेळी विनोदचा मित्र प्रीतेश आमले हा सुद्धा घरी आला होता. त्यावेळी विनोदजवळ सर्व्हिस पिस्तूल होते. असे सांगितले जाते की, पिस्तूल चालवण्याबाबत विनोद प्रीतेशला सांगत होता. विनोद नशेत असल्याने प्रीतेश घाबरला. त्याने विनोदला पिस्तूल आलमारीत सुरक्षित ठेवण्यास सांगितले आणि तो निघून गेला. तो गेल्यानंतर विनोदने आत्महत्या केली. हे समजताच प्रीतेशही अवाक् झाला. विनोद असे काही करेल याची शंकाही त्याला नव्हती. त्याला जर असे काही होऊ शकते, याची कल्पनाही आली असती तर त्याने घरच्यांना सतर्क केले असते.  

 सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  एसपीयू राज्य पोलिसांची सर्वात महत्त्वपूर्ण शाखा आहे. यात निवड करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केली जाते. त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डसोबतच व्यक्तिगत गोष्टीही लक्षात घेतल्या जातात. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यास व्हीआयपी किंवा नेत्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. नागपुरात व्हीआयपी आणि महत्त्वपूर्ण नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

 दोन दिवसांपासून नव्हता ड्युटीवर मिळालेल्या माहितीनुसार ‘रिझर्व्ह’ असल्याने विनोद दोन दिवसांपासून ड्युटीवर गेला नव्हता. दारू पिऊ लागला होता. एसपीयू अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावाने पिस्तूल जारी केले जाते. पिस्तूलची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे ड्युटीवर नसतानाही पिस्तूल त्याच्याजवळच होते.                                         

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस