शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नियमांचे उल्लंघन, ६०८० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:45 IST

शहरात कोविड-१९ चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जारी दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार महापालिकेतर्फे केले जात आहे. नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६,०८० नागरिकांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करून २८ लाख ९० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोविड-१९ चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जारी दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार महापालिकेतर्फे केले जात आहे. नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६,०८० नागरिकांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करून २८ लाख ९० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मास्क न लावणे, बाजारामध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणे अशा बाबींसंदर्भात मनपाने ५ जून ते २१ जुलैदरम्यान करवाई करून हा दंड वसूल केला.‘मिशन बिगीन’अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाजारांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी दुकानांसाठी नियमावली तयार केली. यात सम व विषम तारखानुसारच दुकाने सुरू करण्याची तरतूद आहे. तसेच घराबाहेर फिरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मनपातर्फे देण्यात आले आहेत. नियमांचे पालन केले जावे यासाठी महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे स्वत: शहरातील विविध भागात फिरून जनजागृतीही करीत आहेत. उपद्रव शोध पथकाद्वारे सर्व झोनमध्ये धडक कारवाई केली जात आहे. मास्क न लावणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. ५ जून ते २१ जुलैदरम्यान मास्क न लावणाºया ४,६०१ जणांवर कारवाई करून २०० रुपये दंड याप्रमाणे ९ लाख २० हजार २०० रुपये वसूल करण्यात आलेला आहे.बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरुवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते. त्यानुसार ५ जून ते १८ जुलैदरम्यान १३८० दुकानदारांकडून १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नवीन आदेशानुसार सम व विषम तारखांच्या नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा ८ हजार रुपये व तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार दंड वसूल करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार १८ ते २१ जुलैदरम्यान ८० दुकानांवर पहिल्यांदा नियमभंगाची कारवाई करून ५ हजार, याप्रमाणे एकूण ४ लाख दंड वसूल करण्यात आला. तर तिसऱ्यांदा नियम तोडणाऱ्या १९ दुकानांवर कारवाई करीत १० हजार असा १ लाख ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. असा एकूण एकूण १९ लाख ७० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.मंगळवारी १५४ जणांवर कारवाईमंगळवारी महापौर व आयुक्तांनी जनजागृती दौऱ्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई केली. मास्क न वापरणारे आणि सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ३ लाख २ हजार २०० रुपये, मास्क न वापरणाऱ्या १११ जणांकडून २२ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ४३ दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली. दोन लाख ८० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या