शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती प्रक्रियेत आरक्षणाची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST

आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती ...

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरती प्रक्रियेत आरक्षणाची पायमल्ली करण्यात आली आहे. एकूण ११५२ पदांची जाहिरात काढण्यात आली असून यात आरक्षण धोरणानुसार एससी, एसटी, व्हीजे-एनटीसाठी ३५५ जागा सोडणे बंधनकारक होते; परंतु केवळ १३७ जागा सोडण्यात आल्या. अशा प्रकारे एससी-एसटी, व्हीजे-एनटीच्या तब्बल २१८ आरक्षित पदांवरचा हक्क राज्य सरकारने डावलल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी गट अ ची पदे स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरली जात आहेत. यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ११५२ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ९ ते २१ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत; परंतु या जाहिरातीत उघडपणे आरक्षणाची पायमल्ली झाल्याचे दिसून येते. अनुसूचित जातीला १३ टक्के आरक्षण आहे. त्यानुसार एकूण १५० पदे एससीसाठी असायला हव्या होत्या; परंतु केवळ ५४ पदे देण्यात आली. अनुसूचित जमातीला ७ टक्क्यांनुसार ८० पदे हवी होती; परंतु त्यांना केवळ ३१ पदे दिली. व्हीजे (३ टक्के) ३४ पदे असताना त्यांना केवळ १४ पदे दिली. एनटी- बी साठी २८ ऐवजी केवळ १४ पदे. एनटी-सी साठी ४० पदांऐवजी केवळ १५ पदे दिली. तर एनटी- डी साठी २३ पदे असायला हवी होती. त्यांना केवळ ९ पदे देण्यात आली. अशा प्रकारे आरक्षण धोरणाची उघडपणे पायमल्ली करण्यात आली.

- बॉक्स

विशेष मागास व ओपनला झुकते माफ, ओबीसीच्याही जागांमध्ये किंचित वाढ

एकीकडे एससी, एसटी, व्हीजे-एनटीवर अन्याय करण्यात आला आहे, तर दुसरीकडे विशेष मागास व ओपनला झुकते माप देण्यात आले आहे. ओबीसींच्या जागांमध्येही किंचितशी वाढ केली आहे. धोरणानुसार एसबीसी (विशेष मागास प्रवर्ग) यांच्यासाठी २ टक्के आरक्षणानुसार २३ जागा सोडायला हव्या हाेत्या; परंतु त्यांना झुकते माफ देत ४३ जागा सोडण्यात आल्या. तर ओपनसाठी ४३८ जागा सोडणे आवश्यक असताना त्यांना तब्बल ६३१ जागा सोडण्यात आल्या. तसेच ओबीसीला २१८ जागा सोडायला हव्या हेत्या. त्यांच्यासाठी २२६ जगा सोडण्यात आल्या. आर्थिक दुर्बल घटकासाठी १० टक्क्यांप्रमाणे ११५ जागा सोडणे आवश्यक होते. त्यांना बरोबर ११५ जागा सोडण्यात आल्या.

- बॉक्स

-एससी-एसटीवरच अन्याय का?

२०१९ मध्ये झालेल्या भरतीमध्येही एससी, एसटीच्या जागांमध्ये कपात करण्यात आली होती. यावेळी सुद्धा तेच झाले. एससी, एसटीच्या उमेदवारांवरच वारंवार अन्याय का केला जातोय, यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याची शासनाने तातडीने दखल घेऊन हा अन्याय दूर करावा. अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात यावी.

-डॉ. सिद्धांत भरणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन