शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

कायद्यांची पायमल्ली करून सुरू आहेत कत्तलखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:55 IST

राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे.

ठळक मुद्देसुकृत ट्रस्टची धक्कादायक माहितीसर्वोच्च न्यायालय, हरित न्यायाधिकरणाच्या आदेशांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे.शासकीय अनुदानाशिवाय गेल्या २० वर्षांपासून पशू कल्याणाकरिता कार्य करीत असलेल्या सुकृत निर्माण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य पशू कल्याण मंडळाचे सदस्य कनकराय सावडिया यांनी ही धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला दिली. सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅगस्ट २०१२ व हरित न्यायाधिकरणने ३० जानेवारी २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार मांस प्रक्रिया उद्योगांना ते कच्चा माल कोठून आणतात याची माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. परंतु, राज्यात अद्यापही अशी माहिती घेतली जात नाही. त्यामुळे जनावरांची सर्रास अवैध कत्तल करून विदेशात मांस निर्यात केले जात आहे. सावडिया यांनी यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळोवेळी पत्रे लिहिली. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिण्यात आले होते. त्यावरून केंद्रीय मंडळाने राज्य मंडळाला २५ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्र लिहून कत्तलखान्यांना कच्च्या मालाचा स्रोत विचारण्यास सांगितले होते. त्यानंतर सावडिया यांनी १ जून २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात मध्यस्थी करण्याचे व आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती केली. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दाखल घेऊन १२ जून २०१७ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले व यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले. परंतु, एवढे प्रयत्न करूनही परिस्थिती बदलली नाही, असे सावडिया यांनी सांगितले.प्रदूषण व आजार पसरत आहेकत्तलखान्यातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे वातावरणात प्रदूषण पसरत आहे. तसेच, नागरिकांना विविध संसर्गजन्य व अन्य गंभीर आजार जडत आहेत. परिणामी कत्तलखान्यांच्या अवैध कृतीवर तत्काळ नियंत्रण मिळविणे आवश्यक झाले आहे, याकडे सावडिया यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर