शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

विनय वासनकरचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: October 6, 2016 02:56 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टच्या माध्यमातून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने लुबाडणूक केल्याचा आरोप असलेल्या

विशेष न्यायालय : गुंतवणूकदारांना कोट्यवधीने लुबाडल्याचे प्रकरणनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टच्या माध्यमातून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने लुबाडणूक केल्याचा आरोप असलेल्या विनय जयदेव वासनकर याचा जामीन अर्ज बुधवारी एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. त्याचे आतापर्यंत तीन वेळा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात या कंपनीने ३६० गुंतवणूकदारांची ९६ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. या प्रकरणातील फिर्यादी विवेक अशोक पाठक रा. लक्ष्मीनगर यांच्या तक्रारीवरून ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात प्रशांत वासनकर याच्यासह नऊ जणांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्रथम खबरी अहवालानुसार पाठक यांची २ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांनी लुबाडणूक करण्यात आली. २७ जुलै २०१४ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजित चौधरी, अशा तिघांना अटक केली होती. अद्यापही ते कारागृहात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. विनयने वैद्यकीय कारण नमूद करून न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. याशिवाय त्याने न्यायालयात पैसे भरण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यात तो असे म्हणाला होता, ‘माझ्या खात्यात केवळ तीन गुंतवणूकदारांचे ७५ लाख रुपये जमा झालेले आहेत. त्यापैकी दहा टक्के रक्कम मी आता भरतो, जामिनावर सुटल्यानंतर बाकीची रक्कम भरतो.’ (प्रतिनिधी)२५ कोटींची उलाढालया प्रस्तावावर सरकार पक्षाकडून सक्त विरोध करण्यात आला. त्याच्या खात्यात २५ कोटींवर रकमेची उलाढाल झालेली आहे. मार्च ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत आरोपीने खात्यातील संपूर्ण रक्कम काढून घेतलेली आहे. आरोपीचे सर्वच व्यवसाय बंद आहेत. बँक खाते सील आहे. संपत्ती जप्त आहे, अशा वेळी तो पैसे कुठून आणणार आहे. जामिनावर सुटताच तो पळून जाण्याची अधिक शक्यता आहे. आरोपी विनय वासनकर याने मुंबई येथील शेअर दलाल नरेश चंदन आणि चेतना चंदन यांच्या मार्फत ४ कोटी ५० लाखांचे सिक्कीम फेरो अलॉईड कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते. हे शेअर्स अद्यापही विनयच्या नावे ‘ट्रान्सफर’ झालेले नाहीत. यासाठी अंदाजे ३ लाख रुपये खर्च येईल, ही रक्कम तो कुठून आणणार, असा प्रश्न सरकार पक्षाने उपस्थित केला.न्यायालयाने सरकार पक्ष आणि बचाव पक्षाची बाजू ऐकून जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील कल्पना पांडे आणि बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. श्याम देवाणी यांनी काम पाहिले.