शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग हवा

By admin | Updated: February 21, 2017 02:11 IST

रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे.

सुधीर ठाकरे : पंचायत राज विभागातर्फे चर्चासत्र नागपूर : ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्थानिक नागरिकांना केंद्रस्थानी मानून त्यांना विकास कामात सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या सहभागानेच केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते, असे मत केंद्राच्या पंचायत राज विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी मांडले. नाग विदर्भ चेंबर येथे आयोजित ‘ग्रामविकासाची भावी दिशा व उद्दिष्टे’ सुंदर, विकसित व परिपूर्ण गाव या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कृषी महाविद्यालय नागपूर व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो.इंजि. मित्र परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रादेशिक सुदूर संवेदना केंद्राचे मिलिंद वडोतकर, रोटरी क्लबचे मनीष भाटे, जनमंचचे प्रमोद पांडे, अमिताभ पावडे, रेड स्वास्तिकचे मिलिंद नाईक, नागपूर सेंद्रीय शेतीचे हरिसिंग चव्हाण, विकल्पा(ग्रामीण शिक्षण)चे सचिन देशपांडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या निर्मितीपासून ते आजपावेतो ग्रामविकासासाठी नेमलेल्या विविध समित्यांच्या कामाबाबत माहिती देताना ठाकरे म्हणाले की, ग्रामविकास हा सूक्ष्म नियोजनाशिवाय आणि गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे हिवरा बाजारसारख्या विकसित गावांमुळे सिद्ध झाले आहे. अराजकीय व्यक्ती आणि प्रत्यक्ष कामातून घडवून आणलेला ग्राम विकासातील बदल होणे गरजेचे आहे. स्मार्ट व्हिलेज हे स्मार्टसिटीपेक्षा तितकेच महत्त्वाचे असून गावातील पैसा गावातच, सोबतच शहरातील पैसाही गावातच आणण्यावर भर देऊन कृषी विभागाची सिंचनक्षमता वाढविणे, कृषी उत्पादन आणि उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जवळच बाजारपेठा निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुधीर ठाकरे यांनी केले. ग्रामीण जनतेवर विश्वास टाकून समाजाचा ग्रामविकासात सहभाग वाढवून जे काम स्थानिक पातळीवर होते, तेच काम ग्रामविकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे. तरच ग्रामविकास घडून येऊ शकतो. सेंद्रीय शेती, सिंचन, बाजारपेठा, नवनव्या उपग्रहाचा कृषी विकासासाठी वापर, जल आणि मृदासंधारण, साक्षरता, कृषी व कृषिपूरक उद्योग सुरू करणे, सीड व्हिलेज, खत आणि निविष्ठा, कडूनिंब प्रकल्प आदी विषयांवर उपस्थितांनी या चर्चासत्रात आपली मते मांडली. (प्रतिनिधी)