शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विजयादशमी : मंगळवारी ठिकठिकाणी होणार रावणदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 22:31 IST

भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.

ठळक मुद्देशमीपत्र पूजनानंतर होणार सीमोल्लंघनविद्यारंभ दिवस म्हणूनही दसऱ्याचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवरात्रोत्सवाचा खऱ्या अर्थाने समारोप होतो तो दसऱ्याला. दुर्गेने हिरण्यकश्यपूचा वध केला तो दिवस आणि श्रीरामाने रावणाचा वध केला तो दिवस म्हणून विजयादशमीचे महत्त्व आहे. हिरण्यकश्यपू किंवा रावण, हे दोन्ही वाईट वृत्तीचे प्रतीक मानून भारतीय जनमानस परंपरागत पद्धतीने रावणाचा वध करून अर्थात दहन करून विजयादशमीचा अर्थात दसऱ्याचा सोहळा साजरा करतात. त्याअनुषंगाने मंगळवारी शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा होणार आहे.रावणदहनाचा प्रमुख कार्यक्रम सनातन धर्म युवक सभेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे साजरा होईल. दुपारी ४ वाजता शस्त्रपूजनानंतर रामलीलेतील काही प्रसंगांचे सादरीकरण येथे होईल आणि संध्याकाळी ६ वाजता रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाईल. शहरातील दुसरा मोठा कार्यक्रम महाल येथील चिटणीस पार्क मैदानावर पार पडेल. रावणदहन आयोजन समितीतर्फे रावणदहनाचा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता होईल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर प्रवीण दटके, बडी मारवाडा माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष पुरुषोत्तम मालू, दयाशंकर तिवारी, संजय बालपांडे, विद्या कन्हेरे, सरला नायक उपस्थित राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम सारडा, आरबीआय टास्क फोर्सचे सदस्य रमेश मंत्री यांचा सत्कार केला जाईल. तत्पूर्वी चिटणीस पार्क मैदानापर्यंत श्री शिरपूरकर राममंदिर, बडकस चौक येथून शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रतिमांसह ढोलताशा, मिरवणूक पथक यांचा समावेश असेल. यासोबतच यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे वर्धारोड येथील पूर्व समर्थनगरच्या मनपा मैदानात, वीर हनुमान मंदिरतर्फे नरेंद्रनगर येथील उज्ज्वल सोसायटीमध्ये, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे गांधीनगर येथे रावणदहनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय, शहरातील विविध धार्मिक स्थळांवर विजयादशमी उत्सव साजरा केला जाणार आहे.घरोघरी शमीपत्रांचे पूजन केल्यानंतर नागरिक सीमोल्लंघन करून एकमेकांना शुभेच्छा देतील. त्याअनुषंगाने दसरा मिलनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. यासोबतच विजयासाठीचा मार्ग सुकर व्हावा म्हणून विजयादशमीला विद्यारंभ करण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्याअनुषंगाने काही धार्मिक स्थळांवर विद्यारंभ संस्कारांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Dasaraदसराnagpurनागपूर