शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव गुरुवारी : ‘हायटेक’ राहणार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ््यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारांसाठी कार्यरत असणारे व नोबेल पुरस्कारविजेते कैलास सत्यार्थी हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. महागाई, इंधन दरवाढ, राममंदिर, ‘मी टू’ इत्यादी मुद्द्यांवरुन राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भुमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदाचा विजयादशमी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा संघाचे प्रयत्न आहेत.

ठळक मुद्देसरसंघचालक देणार केंद्राला बौद्धिक?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ््यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारांसाठी कार्यरत असणारे व नोबेल पुरस्कारविजेते कैलास सत्यार्थी हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. महागाई, इंधन दरवाढ, राममंदिर, ‘मी टू’ इत्यादी मुद्द्यांवरुन राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भुमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदाचा विजयादशमी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा संघाचे प्रयत्न आहेत.पुढील वर्षी लोकसभा निवडणूका आहेत. त्याचप्रमाणे पुढील महिन्यातच मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात निवडणूका आहेत. मागील चार वर्षांपैकी यंदा जनतेमधून केंद्र शासनाविरोधात नाराजीचा सूर जास्त प्रमाणात उमटत आहेत. अशा स्थितीत केंद्राचे आर्थिक धोरण, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, कृषी व ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.संघाच्या शस्त्रपूजनाबाबत विविध कयास वर्तविण्यात येत होते. मात्र शस्त्रपूजन ही भारतीय परंपरा आहे व यंदादेखील शस्त्रपूजन होईलच, असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.‘ ट्विटर ’, ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा पाचवा विजयादशमी उत्सव असला तरी शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोहळ्याचे संघाच्या संकेतस्थळावरुन ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. सोबतच प्रथमच ‘फेसबुक’सह,  ट्विटर, युट्यूब या माध्यमातूनदेखील संघाचा कार्यक्रम जगभरात ‘लाईव्ह’ होणार आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसरा