शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवार खात्यांचा कार्यभार स्वीकारणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 21:52 IST

मंत्रिमंडळ विस्तारात दुय्यम मंत्रिपदं मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे प्रचंड दुखावले असून त्यांची नाराजी कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार नसून बुधवारी मुंबईत होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनालादेखील जाणार नाहीत.

ठळक मुद्देदुय्यम खाती मिळाल्याची नाराजी कायम : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला न जाण्याचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मंत्रिमंडळ विस्तारात दुय्यम मंत्रिपदं मिळाल्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे प्रचंड दुखावले असून त्यांची नाराजी कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार नसून बुधवारी मुंबईत होणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनालादेखील जाणार नाहीत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाही. येत्या आठवड्याभरात ते धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे.कॉंग्रेसच्या प्रतिकूल काळात वडेट्टीवार यांनी विदर्भात कॉंग्रेसला ताकद देण्याचे काम केले. विरोधी पक्षनेता या नात्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीत विदर्भातील कॉंग्रेस उमेदवारांना तन मन धनाने सहकार्यही केले. विरोधी पक्षनेता राहिल्यामुळे त्यांना महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाचा मान मोठा असतो व हे पद भूषविल्यानंतर दुय्यम खाती मिळाल्याने वडेट्टीवार नाराज झाले. वडेट्टीवार यांना दुय्यम खाती दिल्यामुळे त्यांचे समर्थकदेखील विविध प्रश्न उपस्थित करत आहेत.भारतीय संविधानाच्या १२६व्या सुधारणा विधेयक २०१९ च्या ठरावास संमती देण्यासाठी बुधवारी मुंबईत एक दिवसांचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात नवीन मंत्र्यांचा परिचयदेखील होणार आहे. या अधिवेशनाला संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. परंतु या अधिवेशनाला न जाण्याचा निर्णय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. शिवाय ते मंत्रालयाचा कार्यभारदेखील स्वीकारणार नाहीत. विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतरदेखील दुय्यम खाती मिळाली असल्याने ते सहाजिकच दुखावलेले आहेत. पक्षश्रेष्ठींना त्यांनी आपली भावना कळविली आहे. कुठल्याही क्षणी ते धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. वडेट्टीवार यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.नाराज आमदारांनी साधला संपर्कमहाविकासआघाडीच्या सरकारमध्ये मंत्री किंवा राज्यमंत्रिपद मिळेल अशी अनेक कॉंग्रेस आमदारांना अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षापूर्ती न झाल्याने काही आमदार नाराज झाले आहेत. मंत्रिपद न मिळालेल्या कॉंग्रेस आमदारांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारministerमंत्री