शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

By कमलेश वानखेडे | Updated: April 8, 2024 16:39 IST

कोण शिवसेना वाचवतो हे येणारा काळ आणि जनता ठरवेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

नागपूर : मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहागिरदार केला. आता तेच राजा होण्याचे स्वप्न पाहत आहे. ज्यांनी राजा केला त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवत आहे. जनता हे सहन करणार नाही, कोण शिवसेना वाचवतो हे येणारा काळ आणि जनता ठरवेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधानांच्या कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. लोक त्यांना ऐकायला जातील पण मतदान करणार नाहीत. एकनाथ खडसे यांच्या गळ्याला फास लागला आहे. या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका खडसे यांनी घेतली असावी, असे वडेट्टीवार म्हणाले. 

सांगलीबाबत टोकाची भूमिका घेऊन नये, मार्ग काढू असे नाना पटोले बोलले आहेत. संजय राऊत यानी आघाडी धर्म पाळताना सामंजस्याने भूमिका ठेवावी. खा. नवनीत राणा या शरद पवार सारख्या जेष्ठ नेत्याचा आशिर्वाद व काँग्रेसच्या मतांमुळे निवडून आल्या होत्या. आता त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. संजय निरुपम यांना काँग्रेसने पक्षातून काढून टाकले आहे. ते कुठे जातात याच्याशी आता काँग्रेसला काही देणेघेणे नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.भाजपमध्ये एकमेकांचा काटा काढणे सुरू

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली होती. आता काँग्रेस एकसंघ आहे. ही कीड आता भाजपमध्ये सुरू झालेली आहे. उंदराला घुस व्हावं असं वाटतेय. घुशीला बोक्या व्हावे, बोक्याला वाटते की मी त्यापेक्षा चपळ प्राणी व्हावं. राजकारणात एखाद्याचा काटा काढला की दुसऱ्याचा काटा काढला जातोच. भाजपमध्ये महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता हे काटा काढण्यासाठी दाबन वापरतात की सुई हे येत्या काही दिवसात कळेल, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी काढला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार