शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

विजय रत्न सुंदर सूरीश्वरजींचा चातुर्मास आजही आठवणीत

By admin | Updated: January 26, 2017 02:48 IST

आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे

नागपूर : आचार्य विजय रत्न सुंदर सूरीश्वरजी म.सा. यांचे प्रेरक उद्बोधन अद्यापही नागपूरकरांच्या आठवणीत आहे. २०१२ साली चातुर्मासादरम्यान त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आयुष्याला खऱ्या अर्थाने सत्कारणी लावण्यासंदर्भातील बाबींवर प्रकाश टाकला होता. जाती, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या सान्निध्यात अक्षरश: प्रेरणासुमनांचा वर्षाव झाला. नागपुरातील चातुर्मासादरम्यानच्या उद्बोधनात आचार्यांनी शिक्षण व परमात्म्याच्या भक्तीवर भर दिला होता. २ जून २०१२ रोजी त्यांचे आगमन झाले तेव्हा शहरातील मान्यवर व जनता त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आली होती. प्रवचनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अमृतवाणीच्या धारा बरसल्या होत्या. देश आणि समाजहिताच्या कार्यांची अंमलबजावणी करीत असताना आपण काही मुद्यांवर गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. वेळेचे महत्त्व विशद करीत असताना त्यांनी ‘व्हिजन’च्या मुद्यावर भर दिला होता. संपत्तीच्या नावाखाली आपण पैसे जमा करण्यासाठी झटतो, मात्र वेळ सातत्याने सरत असते. त्या क्षणांना आपल्या सत्कृत्यांनी जतन करण्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते म्हणाले होते.(प्रतिनिधी) मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे प्रत्येक व्यक्ती वस्तू वाढविण्यासाठी आणि सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे व्यक्तीचा अहंकार वाढतो, मात्र समाधान व शांती लाभत नाही. जितका अहंकार, तितकी अशांती असते. मनुष्याच्या आयुष्यात संबंधांना फार महत्त्व आहे. संबंध खराब होऊ देऊ नका. जर खराब झाले तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. अहंकार हा संबंधांचा सर्वात मोठा शत्रू आहे. संबंधांचा कधीच स्वाभाविक मृत्यू होत नाही, त्यांची हत्याच होते. आपल्याला स्वत:चे अधिकार व दुसऱ्यांचे कर्तव्य जास्त आठवणीत राहतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी संघर्ष, अशांती व वादाची स्थिती निर्माण होत आहे. संपत्ती जमा करण्याचा व अधिकार गाजविण्याचा नशा, ही संबंध बिघडविण्याचे सर्वात मोठे कारण बनते. कुठलाही कैदी शिक्षा किंवा हेटाळणीतून नाही, तर प्रेमाने बदलतो व सुधारतो. याचप्रकारे समाज व आयुष्यात कुठल्याही व्यक्तीबाबत हेटाळणीची प्रवृत्ती ही आपल्या लोकांसोबतच संबंध बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरते. साधना, समाधी आणि समता ठेवणारा व्यक्ती साधू बनतो, असा समज बनला आहे. प्रत्यक्षात दुसऱ्यांना मदत करणारा खऱ्या अर्थाने साधू म्हणवून घेण्याचा अधिकारी आहे.