नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी विजय किसनराव मतेला त्याची पत्नी आजारी असल्यामुळे ३० दिवसांची अभिवचन रजा (पॅरोज) मंजूर केली आहे.विभागीय आयुक्तांनी मतेचा पॅरोल अर्ज फेटाळला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. पिंटू शिर्के हत्याकांडप्रकरणात नागपूर सत्र न्यायालयाने मतेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हे हत्याकांड १९ जून २००२ रोजी घडले होते. विजय मतेवर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पिंटू शिर्के व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायमंदिराच्या सहाव्या माळ्यावर होते.घटनेच्या दिवशी पिंटू शिर्के व त्याच्या साथीदारांना न्यायालयात आणण्यात आले होते. दरम्यान, विजय मते व त्याच्या १४-१५ साथीदारांनी घेराबंदी करून पिंटूवर गुप्ती, चाकू, कुकरी आणि भाल्याच्या पात्याने हल्ला केला होता. मेयो इस्पितळाकडे नेताना पिंटूचा मृत्यू झाला होता. आरोपीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
विजय मतेला पॅरोल- हायकोर्ट : पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी
By admin | Updated: November 22, 2014 02:20 IST