लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: हिंगण्याचे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी शनिवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची घोडमारे यांनी भेट घेतली. या बैठकीनंतर एका छोटेखानी समारंभात घोडमारे यांनी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेश बंग, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत उपस्थित होते. पक्ष आपल्यावर जी जबाबदारी सोपवेल ती प्रामाणिकपणे निभावू अशी प्रतिक्रिया घोडमारे यांनी व्यक्त केली आहे.
नागपूर जिल्ह्यात हिंगणा येथील माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 16:06 IST