शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विजय डांगरे गुंतवणुकदारांना पैसे परत करणार : हायकोर्टात ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:16 IST

महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांनी पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची व इच्छुकांना त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.

ठळक मुद्देमालमत्तेचे विक्रीपत्र करून देण्याचीही तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांनी पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची व इच्छुकांना त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.गत १० जानेवारी रोजी सक्करदरा पोलिसांनी नवीन शुक्रवारी येथील पीडित गुंतवणूकदार रामूजी बाबुराव वानखेडे (६६) यांच्या तक्रारीवरून डांगरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ५०४ व ५०६-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी डांगरे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात दोन कोटी रुपये जमा केल्यामुळे त्यांना सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. हे प्रकरण सोमवारी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता डांगरे यांनी स्वत:च पुढाकार घेऊन न्यायालयाला वरीलप्रमाणे ग्वाही दिली. त्यानंतर न्यायालयाने डांगरे व गुंतवणूकदार यांच्यातील वादावर आवश्यक निर्णय देण्यासाठी अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आणि डांगरे व गुंतवणूकदारांना येत्या ६ जून रोजी दुपारी २.३० वाजता अ‍ॅड. पुरोहित यांच्यासमक्ष उपस्थित होण्यास सांगितले. तसेच,याचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्यात यावा असा आदेश पुरोहित यांना दिला.अशी आहे पोलीस तक्रारपोलीस तक्रारीतील माहितीनुसार, डांगरे यांनी सरकारी जमीन स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती तक्रारकर्ते वानखेडे यांच्यासह अनेकांना विकली. जमीन सरकारी असल्याची माहिती झाल्यानंतर वानखेडे यांनी डांगरे यांना पैसे परत मागितले होते. परंतु, डांगरे यांनी त्यांना सहकार्य केले नाही. उलट, त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डांगरे यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयInvestmentगुंतवणूक