शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कपडे बदलताना तरुणीची व्हिडिओ क्लीप बनविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 21:40 IST

चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविताना दोन भामट्यांनी युवतीचा अश्लिल व्हिडीओ तयार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युवतीने आरडाओरड करून कपड्याच्या शोरूमचा मालक आणि त्याच्या साथीदाराचे बिंग फोडले.

ठळक मुद्देचेंजिंग रूममध्ये मोबाईल सीताबर्डीतील फ्रेण्डस शोरूमचा मालक व साथीदार गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविताना दोन भामट्यांनी युवतीचा अश्लिल व्हिडीओ तयार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युवतीने आरडाओरड करून कपड्याच्या शोरूमचा मालक आणि त्याच्या साथीदाराचे बिंग फोडले. तिने पोलिसांत तक्रार नोंदवल्यामुळे पोलिसांनी या दोघांना अटक केली. सीताबर्डीतील फ्रेण्डस नामक कपड्याच्या दुकानात शुक्रवारी रात्री ही संतापजनक घटना घडली.तक्रार करणारी १७ वर्षीय युवती बाहेरगावची रहिवासी आहे. ती नागपुरात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असून, हिंगण्यात भाड्याच्या रूममध्ये राहते. शुक्रवारी रात्री एका मैत्रीणीसह सीताबर्डीतील फ्रेण्डस नामक रेडिमेड कपड्याच्या दुकानात आली. आवडलेला ड्रेस बरोबर होतो की नाही, ते घालून बघण्यासाठी ती चेंजिंग रूममध्ये गेली. तेथे ती कपडे बदलवित असताना तिला चेंजिंग रूममध्ये कोप-यात मोबाईल लपवून दिसला. तिने तो काढून बघितला तेव्हा त्यात व्हिडीओ शुटिंग सुरू असल्याचे तिला दिसले. कपडे बदलविताना तिला स्वत:चा व्हिडीओ दिसला. ते पाहून तिने आणि तिच्या मैत्रीणीने दुकानमालक आरोपी किसन इंदरचंद अग्रवाल (वय ५४, राधाकृष्ण मंदीर समोर, वर्धमाननगर) याला जाब विचारला. आपले बिंग फुटल्याचे बघून त्याने हा मोबाईल दुकानात काम करणारा आरोपी निखिल उर्फ पिंटू दीपक चौथमल (वय २७, रा. आंबेडकरनगर, पाचपावली) याचा असल्याचे सांगून प्रकरण निस्तरण्याचा प्रयत्न केला. युवतीने लगेच सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी अग्रवाल आणि चौथमलला अटक केली.अनेकींचे बनविले व्हिडीओ ?आपल्या कुकृत्याचा बोभाटा होऊ नये म्हणून आरोपी दुकानदार आणि साथीदाराने बरेच प्रयत्न केले. युवतीची क्षमायाचना करून आणि तिला बदनामीचा धाक दाखवून तिच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवती आणि तिच्या मैत्रीणीने आरोपींना त्यांच्या कुकृत्याचा धडा शिकविण्यासाठी ठामपणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली.आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही महिला मुलींचे व्हिडीओ तयार केले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कसून तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी