शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

विदर्भाचा आवाज, महाराष्ट्राचा हुंकार

By admin | Updated: May 2, 2017 01:41 IST

वेगळ््या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला.

विदर्भवाद्यांचा ‘एल्गार’ विदर्भाचा झेंडा फडकला ‘रक्ताक्षरी’ मोहिमेची सुरुवात अखंड महाराष्ट्रवाद्यांनी केला जल्लोषनागपूर : वेगळ््या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विदर्भवाद्यांनी आपला निषेध व्यक्त करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली. दुसरीकडे अखंड महाराष्ट्रवाद्यांनीदेखील महाराष्ट्रदिनाचा जल्लोष केला. वेगळ््या विदर्भाच्या मुद्यावरून वातावरण तापण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही तुरळक घटना वगळता एकूणच १ मेचा दिवस शांततेत पार पडला.राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील ‘विष्णूजी की रसोई’ येथे सकाळी ९ वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी विविध विदर्भवादी संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जनमंच, विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी यासारख्या विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ.श्रीनिवास खांदेवाले, उमेश चौबे, अ‍ॅड.अनिल किलोर, हरिभाऊ केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय कर्णिक, अ‍ॅड.मुकेश समर्थ, संदेश सिंगलकर, अ‍ॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर, अ‍ॅड.फिरदोस मिर्झा, तेजिंदरसिंह रेणू, शैलेंद्र हारोडे, अ‍ॅड.नीरज खांदेवाले, सुरेंद्र पारधी हे प्रामुख्याने उपस्थित होते. दुसरीकडे सकाळी ९.३०च्या सुमारास विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गिरीपेठ येथील कार्यालयाजवळ वेगळ््या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.(प्रतिनिधी)‘आप’तर्फे विदर्भाच्या समर्थनार्थ निदर्शनेआम आदमी पक्षातर्फे व्हेरायटी चौकात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी व्हेरायटी चौक येथे निदर्शने करण्यात आली. भाजपाने भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा ठराव संमत केला होता. मात्र सत्तेत आल्यावर भाजपाला याचा विसर पडला असल्याचा आरोप लावण्यात आला. यावेळी ‘आप’तर्फे देवेंद्र वानखडे, जगजित सिंह, अशोक मिश्रा, भूपाल सावरकर, नीलेश गोयल, चंद्रशेखर पराड, करण शाहू, मीनाताई भोयर, प्रभात अग्रवाल उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शनेदरम्यान, काही विदर्भवाद्यांनी धरमपेठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ राज्य शासनाविरोधात निदर्शने केली. भाजपने विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी त्वरित हालचाल करीत अवघ्या मिनिटाभरातच सात ते आठ आंदोलकांना ताब्यात घेतले. ‘रक्ताक्षरी’ मोहिमेला नागपुरातून प्रारंभवेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसंदर्भात ‘विरा’तर्फे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निवेदन देण्यात येणार आहे. पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रावर विदर्भवादी स्वत:च्या रक्ताचा अंगठा लावणार आहेत. काळा दिवस पाळत असताना अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी मेहाडिया चौकात आयोजित कार्यक्रमादरम्यान रक्ताने स्वाक्षरी या मोहिमेची सुरुवात केली. विदर्भातून १० हजार विदर्भवादी रक्ताने स्वाक्षरी केलेले निवेदन पंतप्रधानांना पाठविणार आहेत. १ मे ते ३१ मे या कालावधीत विदर्भात ही मोहीम राबविण्यात येईल व संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर पंतप्रधानांना निवेदन सोपविण्यात येईल, अशी माहिती ‘विरा’तर्फे देण्यात आली आहे. यावेळी ‘विरा’चे कार्याध्यक्ष स्वप्नजित संन्याल, डॉ.दिलीप नरवडीया, कमलेश भगतकर, निखील भुते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आयोजनस्थळी रक्तपेढीचे तज्ज्ञ तसेच विदर्भ फार्मसी असोसिएशनचे सदस्यदेखील उपस्थित होते.तेलंगणासारखी हिंसा करायची नाहीश्रीहरी अणे : देशात नरेंद्र मोदी हे एकमेव नेतेभाजपाच्या नेत्यांनी वेगळ््या विदर्भाचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचे पालन केले नाही. त्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे, ही दुर्दैवी बाब आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या लढ्यात अनेक तरुणांना जीव गमवावा लागला. विदर्भासाठी अशी हिंसा आम्हाला नको आहे. मात्र कुणी आमच्याविरोधात हिंसा केली तर त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागेल या शब्दांत राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.अ‍ॅड.अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगरातील ‘विष्णू की रसोई’ येथे सकाळच्या सुमारास वेगळ््या विदर्भाचा झेंडा फडकविण्यात आला. तसेच त्यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत ‘विरा’तर्फे ‘रक्ताक्षरी’ या मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.देशात विदर्भाची निर्मिती करण्याची क्षमता केवळ एकाच नेत्यात आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्यासमोर इतर कुठल्याही नेत्याला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा लढा पोहोचणे गरजेचे आहे. यासाठीच १० हजार विदर्भवादी आपल्या रक्ताने स्वाक्षरी केलेले पत्र त्यांना पाठवून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबतच्या आश्वासनाची आठवण करून देणार आहेत, असे अ‍ॅड.अणे यांनी यावेळी सांगितले.लोकप्रतिनिधींना विचारला जाबदरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे महाराष्ट्रदिनी काळा दिवस पाळण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह विदर्भातील सर्व मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, आमदारांना वेगळे राज्य केव्हा देता असा भ्रमणध्वनीवरून जाब विचारण्यात आला. मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ शकला नाही. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.कृष्णा खोपडे, आ.सुधाकर कोहळे, आ.पंकज भोयर, आ.मिलिंद माने, आ.चैनसुख संचेती, आ.समीर मेघे. आ.सुनील देशमुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला. बहुतांश जणांनी विदर्भाच्या बाजूने असल्याचे सांगितल्याचा दावा मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला. उपस्थितीत समितीच्यावतीने गिरीपेठेतील मुख्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजारोहणदेखील करण्यात आले. यावेळी डॉ.श्रीनिवास खांदेवाले, अ‍ॅड.नंदा पराते, अरविंद देशमुख, अरुण कोहळे, वनश्री सिडाम इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.