शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

इनोव्हेशनमुळे दूर होईल विदर्भाची गरीबी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:48 IST

इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देइनोव्हेशन पर्वमध्ये नागपूर स्टार्टअप फेस्टचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाचा प्रदेश नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न आहे. जंगलातील, शेतीतील उत्पादनावर संशोधन करण्याची गरज आहे. या क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमधून इनोव्हेशन केल्यास शेतकरी, आदिवासींना लाभ मिळेल आणि हजारो तरुणांना रोजगारही मिळेल. इनोव्हेशनमुळेच विदर्भातील गरीबी दूर होउ शकेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.नागपूर महानगरपालिका व मेयर इनोव्हेशन कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व २०१९’ अंतर्गत ‘नागपूर स्टार्टअप फेस्ट’चे नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी इनोव्हेशन डायरेक्टर मोहीत गंभीर, मराठी चित्रपट अभिनेता संदीप कुळकर्णी, भारत गणेशपुरे, गीतकार संदीप नाथ तसेच मनपा आयुक्त अभिजित बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, केतन मोहीतकर, चेत जैन, नगरसेविका गार्गी चोपडा आदी उपस्थित होते.नितीन गडकरी पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मिळणाऱ्या मोह, बांबू, रतनजोत, करंज आदींपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता असून त्यावर प्रयोग सुरू आहेत. भंडारा, चंद्रपूर भागात धानकटाईनंतर निघणारी तणस तसेच नॅपीयर गवत आणि नागपुरात मटन मार्केट व भाजी बाजारातून निघणाºया टाकाउ पदार्थापासून मोठ्या प्रमाणात ‘बॉयो-सीएनजी’ तयार करण्याचा प्रयोग वेगात सुरू आहे. हे सीएनजी पेट्रोल-डिझेलसाठी पर्याय ठरणारा आहे. या सीएनजीवर महापालिकेच्या बसेस, ट्रक आणि विमाने चालविण्याचा प्रयोग यशस्वीपणे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात इथेनॉल व बॉयोसीएनजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू होणार असून येत्या ५ वर्षात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे डिझेलमुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पाच वर्षात ५० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी संत्रा बर्फीचा प्रयोग, उसाच्या टाकाऊ पदार्थापासून साबण, लघवीपासून युरिया खत बनविण्यासह अनेक संकल्पनांची यादीच सांगितली. आपल्याकडे गुणवत्ता, पैसा व तंत्रज्ञानाचीही कमी नाही, कमतरता आहे केवळ आत्मविश्वासाची. गुणवत्ता, क्षमता व कौशल्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे बॉयोसीएनजी प्रकल्प साकारला जात असून मनपाच्या ३५० बसेस, १५० ट्रक येत्या ३ महिन्यात संचालित करण्यात येणार असून यातून मनपाचे वर्षाला ६० कोटी रुपये वाचतील, अशी माहिती त्यांनी दिली.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtechnologyतंत्रज्ञान