शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकास मंडळाला २८ फेब्रुवारीनंतर कुलूप लागणार? कर्मचाऱ्यांना कार्यकाळ विस्ताराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 08:00 IST

Nagpur News विदर्भासह मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजीच संपला आहे. परंतु तिन्ही कार्यालये सुरू आहेत. आता या कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा कार्यकाळसुद्धा येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.

ठळक मुद्देमंडळावरील संकट वाढले

कमल शर्मा

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईत घेण्याच्या निर्णयामुळे आधीच विदर्भवाद्यांमध्ये नाराजी पसरली अहे. यातच विदर्भ विकास मंडळावरील संकटही आणखी गडद झाले आहे. विदर्भासह मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजीच संपला आहे. परंतु तिन्ही कार्यालये सुरू आहेत. आता या कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा कार्यकाळसुद्धा येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. कार्यकाळ विस्तारासंदर्भात अजूनपर्यंत कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. वेळीच निर्णय घेतला नाही तर मंडळाचे कार्यालयसुद्धा बंद करण्याची वेळ येऊ शकते.

संविधानाचे कलम ३७१ (२) अंतर्गत १९९४ मध्ये विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रादेशिक विकासाचा समतोल कायम राहावा, यासाठी राज्यपाल राज्य सरकारला अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी दिशा-निर्देश देत होते. २०२० मध्ये विकास मंडळांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या मुदतवाढीसाठी कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. राज्यपाल व महाविकास आघाडीदरम्यान असलेल्या राजकीय संघर्षामुळे मंडळांचे अस्तित्व तांत्रिकदृष्ट्या संपले आहे. कार्यालय मात्र अजूनही सुरू आहे. राज्य सरकारने नियोजन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे नियुक्त केले आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना मिळालेली सहा महिन्यांची मुदतवाढही येत्या २८ फेब्रुवरी रोजी संपत आहे. जर त्यांच्या कार्यकाळाची मुदत वाढविण्यात आली नाही तर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या विभागात जावे लागेल. अशा परिस्थितीत विदर्भ विकास मंडळ हे अधिकारी-कर्मचाऱ्यांअभावी बंदच होईल.

अध्यक्ष, सदस्य सचिव नाही, परंतु पी.ए. कायम

राज्य सरकारने मागच्या वर्षी आयएएस दीपक सिंघला यांना सदस्य सचिव नियुक्त करून विकास मंडळाचे पुनरुज्जीवन करण्याचे संकेत दिले होते. परंतु ७ नोव्हेंबर रोजी त्यांची बदली करण्यात आली. अध्यक्षपद तर २०२० मध्ये मंडळाचा कार्यकाळ संपताच समाप्त झाले होते. सध्या या दोन्ही पदांचे खासगी सहायक (पीए) अजूनही कार्यरत आहेत. यापैकी एक तर मागच्याच महिन्यात नियुक्त करण्यात आले आहे.

बॅकलॉग कायम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे जारी मागच्या दिशानिर्देशानुसार विदर्भात सिंचनाचा अनुशेष अजूनही कायम आहे. विदर्भातील अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यात १,६३,१३९ हेक्टर बॅकलॉग आहे. दुसरीकडे विदर्भवादी भौतिक बॅकलॉगसह आर्थिक बॅकलॉग विचारात घेऊन तो दूर करण्याची मागणी करीत आहेत.

टॅग्स :Governmentसरकार